Lifestyle : काही लोकांना 5 पेक्षा जास्त बोटे का असतात? जाणून घ्या रहस्य!
काही जन्मजात विकृती अधूनमधून समोर येत असतात. त्यांच्याबद्दल अनेक सामाजिक-सांस्कृतिक धारणाही आहेत. त्या विकृतींना कधी कधी दैवी क्रोध किंवा सौभाग्य आणि आशीर्वाद देखील मानले जाते. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयातील एक विकृती म्हणजे हात-पायात अतिरिक्त बोटे असणे. म्हणजे पाचपेक्षा जास्त बोटे असणे.(Photo Credit : pexels )
आता संशोधकांनी एक दुर्मिळ डिसऑर्डर ओळखला आहे ज्यामुळे मुले अतिरिक्त बोटे आणि अवयवांमध्ये अनेक जन्मजात दोषांसह जन्माला येतात. (Photo Credit : pexels )
या विकाराला अद्याप कोणतेही नाव देण्यात आले नसले तरी मॅक्स नावाच्या जनुकातील जनुकीय उत्परिवर्तनामुळे हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.(Photo Credit : pexels )
ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठातील संशोधकांच्या एका टीमने सांगितले आहे की, अतिरिक्त बोटांमुळे (पॉलीडॅक्टिली) मेंदूच्या विकासाशी संबंधित ऑटिझमसारखी अनेक लक्षणे देखील उद्भवतात. (Photo Credit : pexels )
संशोधकांचा असा दावा आहे की हा अनुवांशिक दुवा प्रथमच ओळखला गेला आहे. यात एक रेणू असल्याचे आढळले आहे जे संभाव्यत: काही न्यूरोलॉजिकल लक्षणांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांची स्थिती बिघडण्यापासून रोखण्यासाठी वापरले जाऊ शकते. (Photo Credit : pexels )
तसेच ,या रेणूचा उपचारासाठी वापर करण्यापूर्वी त्याची चाचणी करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.(Photo Credit : pexels )
अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्समध्ये तीन लोकांवर लक्ष केंद्रित केलेले हे नवे संशोधन प्रकाशित झाले आहे. या व्यक्तींमध्ये शारीरिक लक्षणांचे दुर्मिळ संयोजन आढळले. (Photo Credit : pexels )
अतिरिक्त बोटांव्यतिरिक्त, डोक्याचा घेर देखील सरासरीपेक्षा खूप मोठा असल्याचे दिसून आले (ज्याला मॅक्रोसेफली देखील म्हणतात). अशा लोकांमध्ये डोळ्यांचा उशीरा विकास होण्यासह इतर काही लक्षणे देखील सामान्य असतात, परिणामी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात दृष्टीसमस्या उद्भवतात.(Photo Credit : pexels )
या लोकांच्या डीएनएच्या तुलनात्मक अभ्यासात, संशोधकांना असे आढळले की त्या सर्वांमध्ये सामायिक अनुवांशिक उत्परिवर्तन आहे ज्यामुळे त्यांचे जन्मजात दोष किंवा विकार उद्भवतात. या रुग्णांवर सध्या कोणताही इलाज नाही. याचा अर्थ असा आहे की या दुर्मिळ परिस्थितींवरील हे संशोधन केवळ त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करण्यासाठीच नव्हे तर त्यांच्यावर उपचार करण्याचे संभाव्य मार्ग ओळखण्यासाठी देखील महत्वाचे आहे. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )