Raw Onion Benefits : हे वाचाल तर 'कच्चा कांदा' खाण्यास नकार देणार नाही !
अनेकांच्या रोजच्या आहारात कच्चा कांदा खाण्यात येतो. सर्व पोषक घटक मिळून कांदा एक सुपरफूड बनतो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेवताना कच्चा कांदा आपल्या भारतात घरी असो किंवा हॉटेल मध्ये हमखास मिळतो. [Photo Credit : Pexel.com]
सोडियम, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक कांद्यामध्ये आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
कच्च्या कांद्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
जे शरीराला अनेक रोग आणि संक्रमणांपासून वाचवतात. कच्चा कांदा खाल्ल्याने दृष्टी सुधारते. [Photo Credit : Pexel.com]
कच्चा कांदा मुरुम आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामध्ये सल्फर कंपाऊंड आढळून येते. जे मुरुमे सुकवण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते.[Photo Credit : Pexel.com]
फ्लेव्होनॉइड्स आणि थायोसल्फिनेट्स नावाची संयुगे कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. [Photo Credit : Pexel.com]
फ्लेव्होनॉइड्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून हृदयासाठी फायदेशीर ठरतात. [Photo Credit : Pexel.com]
जर तुमचा पार्टनर इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येने त्रस्त असेल तर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.कांद्यामध्ये असलेले संयुगे लैंगिक आरोग्य सुधारतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]