Children Health : लहान मुलांना चहा-कॉफी देत आहात? आधी हे वाचा!
मुलांना चहा-कॉफीपासून दूर ठेवणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे .बालरोगतज्ज्ञांनीही याबाबत सतर्क केले आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचला जाणून घेऊया मुलांना कोणत्या वयात चहा-कॉफी द्यावी आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो… [Photo Credit : Pexel.com]
मुलांना चहा आणि कॉफी कधी द्यायची : बालरोगतज्ञांच्या मते, 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना चुकूनही चहा-कॉफी देऊ नये. ते त्यांचे नुकसान करू शकते. त्यामुळे त्यांची वाढ थांबू शकते. [Photo Credit : Pexel.com]
जर तुमचे मूलही चहा किंवा कॉफी पीत असेल तर ते लगेच थांबवा. यामुळे गॅस्ट्रिक अॅसिडिटी, हायपर अॅसिडिटी आणि क्रॅम्प्स सारख्या समस्या देखील होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे मुलांची झोपही भंग पावते. जेव्हा त्याच्या झोपेवर परिणाम होतो तेव्हा त्याच्या शरीराच्या वाढीलाही अडथळा येऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
मुलांनी चहा का पिऊ नये? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आढळते, ज्यामुळे मुलांचे दात आणि हाडे कमकुवत होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
अनेक लहान मुलांनाही चहाचे व्यसन असते, त्यामुळे ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण चहा-कॉफीमध्ये असलेले टॅनिन आणि कॅफिन मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या आहारात हर्बल पदार्थांचा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात समावेश असेल, तर त्यांना हर्बल चहा देता येईल. [Photo Credit : Pexel.com]
जे आपल्या मुलासाठी चहा आणि कॉफीचे पर्याय शोधत आहेत त्यांनी आले, पुदिना, लेमनग्रास, वेलची यांसारख्या औषधी वनस्पतींपासून बनवलेला चहा देऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]
मात्र, याआधीही एकदा बालरोगतज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. जेणेकरून मुलांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]