Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health tips : मधुमेही रुग्णांसाठी हे फळ खाणे उत्तम , वाढणार नाही साखरेचे प्रमाण
मधुमेहाचे नाव येताच मनात भीती निर्माण होते कारण हा असा आजार आहे ज्यामध्ये जीवनशैली सांभाळणे गरजेचे आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मध्ये खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण कोणती गोष्ट खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तातील साखर वाढवते हे माहित नसते. [Photo Credit : Pexel.com]
शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत मधुमेही रुग्ण त्यांच्या आहाराबाबत अत्यंत सावध राहतात. [Photo Credit : Pexel.com]
अशा स्थितीत फळांचा विचार केला तर कोणते फळ फायदेशीर आणि कोणते फळ हानीकारक, याबाबत मधुमेही रुग्ण संभ्रमात राहतात.[Photo Credit : Pexel.com]
डाळिंबाबाबतही मधुमेही रुग्णांमध्ये असाच संभ्रम आहे. आज आपण डाळिंबाच्या फायद्यांबद्दल बोलूया आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी डाळिंब हे कोणत्या प्रकारचे फळ आहे हे देखील जाणून घेऊया. [Photo Credit : Pexel.com]
डाळिंबात अनेक पोषक घटक आढळतात. त्यात लोह, व्हिटॅमिन बी आणि सी, व्हिटॅमिन के, भरपूर फायबर, ओमेगा-6 फॅटी ॲसिड, पोटॅशियम, झिंक सोबतच असतात. [Photo Credit : Pexel.com]
यासोबतच, डाळिंब हे अँटी-ऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक्सने समृद्ध फळ आहे. हे सर्व घटक आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि ताकदीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. [Photo Credit : Pexel.com]
डाळिंबाच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो आणि याच्या सेवनाने शरीरातील लाल रक्तपेशी वाढते. गरोदरपणातही डाळिंब खाणे खूप फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]
डायबेटीसमध्ये डाळिंब सहज खाता येते. डाळिंबाच्या बिया मधुमेहविरोधी आहेत. यामध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
डाळिंबात असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे, याच्या सेवनाने मधुमेहाचा धोका कमी होतो.याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. तुम्ही त्याच्या बिया काढून खाऊ शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचा रस काढून पिऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]