Benefits of Sweet Potatoes : उपवासाच्या दिवशी खाल्ले जाणारे ' रताळे ' ठरतील आरोग्यासाठी पोषक !
आपल्याकडे उपवासाच्या दिवशी हे जास्त खाल्ले जातात.त्याच्या गोड चवीमुळे रताळे लहान मुले आणि वृद्ध लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला माहित आहे का? रताळे खाण्याचे काय फायदे आहेत ? नसल्यास जाणून घेऊया रताळे खाण्याचे काय फायदे आहेत.[Photo Credit : Pexel.com]
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर नियमित व्यायामासोबतच तुमच्या डाएट प्लॅनवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. [Photo Credit : Pexel.com]
जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध : रताळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.त्याच्या सेवनाने तुमची त्वचा देखील चमकदार होते.[Photo Credit : Pexel.com]
पचनक्रिया सुधारण्यास मदत होते :डॉक्टर सांगतात की रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे आपली पचनक्रिया निरोगी राहते आणि पचनशक्ती वाढते.आपण जे काही खातो ते सहज पचते. रताळे वजन टिकवून ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते : जर तुम्ही महिनाभर रताळ्याचे नियमित सेवन केले तर ते तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.तो खाण्यास गोड असला तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे साखरेच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते.[Photo Credit : Pexel.com]
लोहाची कमतरता दूर करते : रताळ्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. ज्या लोकांना ॲनिमियाचा त्रास होतो त्यांनी त्यांच्या आहारात रताळ्यांचा समावेश करावा. रताळे खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]