Watch Movies on Women's Day : महिला दिनी पहावे असे सुपरहिट मराठी चित्रपट , एकदा पहाच !
महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य हे समाजात केले जाते यापैकीच महत्वाचे योगदान देतात ते म्हणजे चित्रपट. यापैकीच असे चित्रपट सांगणार आहोत जे केवळ महिलाच नाही तर पुरुषांनी देखील पाहून स्त्रीला समजून घेण्याचा प्रयत्न व्हावा . [Photo Credit : Pexel.com ]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिलांचे भाव विश्व उलगडणारे हे चित्रपट प्रत्येकाने पहावे असे आहेत. आई,मुलगी,पत्नी अशा भूमिका निभावत स्त्री जबाबदाऱ्या पूर्ण करत असते. [Photo Credit : Pexel.com ]
मराठी चित्रपटाने दिलेले 2023 चे बाईपण भारी देवा आणि झिम्मा 2 हे दोन चित्रपट महिलांसाठी वर्षभर विशेष आकर्षण ठरले . [Photo Credit : Pexel.com ][Photo Credit :google.com ]
बाईपण भारी देवा : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध ठरलेला हा चित्रपट. याने सर्व महिला आणि मुलींना वेड लावले . प्रत्येक सिनेमा गृहात महिला ग्रुप ने जात होत्या .[Photo Credit :google.com ]
केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे . विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आवड असणाऱ्या बहीणींची यात मंगळा गौर खेळासाठी केलेली धडपड आणि कष्ट चित्रित करण्यात आले आहे. [Photo Credit :google.com ]
घर,स्वतःची मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती अशा विविध परिस्थितीवर मात करत मंगळागौर खेळासाठी घेतलेली मदत ही रोजच्या जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा चित्रपट प्रेरणा ठरतो .[Photo Credit :google.com ]
झिम्मा 2 : हेमंत ढोमे यांनी अभिनेत्यांची एक विलक्षण टीम एकत्र आणली आणि झिम्मा हा चित्रपट तयार केला जो प्रेक्षक आणि समीक्षकांना आवडला होता. [Photo Credit :google.com ]
24 नोव्हेंबर 2023 रोजी मध्ये झिम्मा 2 ची कथा पुढे आणली हा चित्रपट महिलांच्या सहली आणि उत्सवांसह उलगडतो. [Photo Credit :google.com ]
झिम्मा 2 तुम्हाला त्याच्या आनंदी दृष्टिकोनाने हसवते, परंतु आत्मपरीक्षण देखील करते. भिन्न लोक, भिन्न व्यक्तिमत्व, भिन्न दृष्टीकोन झिम्मा २ मध्ये हे सर्व एकत्र बांधलेले आहे. [Photo Credit :google.com ]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit :google.com ]