Skin Care : त्वचेची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारे करा तांदळाच्या पिठाचा वापर,कोरडेपणापासून निस्तेज त्वचेपर्यंत सर्व प्रकारच्या समस्या होतील दूर!

त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर सर्वात फायदेशीर आहे. फेस वॉश, सनस्क्रीन, स्क्रबर नसताना स्वयंपाकघरात असणारे बेसन, हळद, तांदळाचे पीठ अशा गोष्टी स्किन केअरचा अत्यावश्यक भाग असायचे. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्याच्या वापराने सौंदर्य तर वाढतेच पण वाढत्या वयाचा परिणामही थांबवता येतो. तांदळाचे पीठ आपल्या त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे आणि ते कसे वापरले जाऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊ. (Photo Credit : pexels )

तांदळाच्या पिठापासून तुम्ही बॉडी लोशन बनवू शकता, ज्यामुळे त्वचा खोलवर मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे कोरडेपणाची समस्या दूर होते आणि त्वचेचा कोमलपणा टिकून राहतो. (Photo Credit : pexels )
आपण ते दररोज बनवू शकता, प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी कोरफड जेल आणि खोबरेल तेल समप्रमाणात मिसळावे. चांगले मिक्स करा आणि नंतर त्यात सुमारे दोन चमचे तांदळाचे पीठ घाला. आंघोळीनंतर त्वचेवर लावा.(Photo Credit : pexels )
तांदळाचे पीठ खूप चांगले स्क्रब आहे. ज्यामुळे छिद्रांमध्ये साचलेली घाण बाहेर काढून चमक मिळते. स्क्रब बनवण्यासाठी तांदळाच्या पिठात मध आणि गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करावी. चांगले मिक्स करा. हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी बाहेर पडतात. (Photo Credit : pexels )
तांदळाच्या पिठापासून बनवलेला फेस मास्क झटपट चमक देतो. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. तोंडाला मास्क बनवण्यासाठी तांदळाच्या पिठासोबत मसूर डाळीचाही वापरही केला जातो. (Photo Credit : pexels )
यासाठी मसूरडाळ रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी अगदी थोड्या पाण्याने बारीक करून घ्या. नंतर त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घालावे. हा फेस मास्क 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )