Anita Hassanandani : रोहित रेड्डीपूर्वी अनिता हसनंदानी या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती, जाणून घ्या!
टीव्हीची प्रसिद्ध नागिन अभिनेत्री अनिता हसनंदानीने 14 एप्रिल रोजी तिचा 43 वा वाढदिवस साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिता हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. आज जरी अभिनेत्री रोहित रेड्डीसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत असली तरी एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री एजाज खानच्या प्रेमात वेडी होती.
प्रेमात फसवणूक झाल्याने अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली होती.
एक काळ असा होता जेव्हा अनिता तिचा को-स्टार अभिनेता एजाज खानला डेट करत होती. मात्र, हे नाते एका वाईट वळणावर तुटले.
अनिता आणि एजाज यांची पहिली भेट 2005 मध्ये एकता कपूरच्या टीव्ही शो 'काव्यांजली'मध्ये झाली होती. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि लवकरच दोघेही एकमेकांना डेट करू लागले
त्यावेळी अनिता एजाजशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत असताना एजाजने तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.
बऱ्याच दिवसांनी अनिता हसनंदानी यांना कळले की एजाज खान आपली फसवणूक करत आहे. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो गायिका नताली आणि निधी कश्यप यांनाही डेट करत होता.
अनिताला ही गोष्ट समजताच तिचा विश्वास बसेना आणि तिने एजाजसोबतचे सर्व संबंध संपवले. 2010 मध्ये अनिता आणि एजाज कायमचे वेगळे झाले.
2013 मध्ये तुटलेल्या अनिताच्या आयुष्यात प्रेमाने पुन्हा एकदा दार ठोठावले. बिझनेसमन रोहित शेट्टीसोबत लग्न करून तिने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. आज दोघेही एका मुलाचे आई-वडील आहेत. अनिता तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. (photo:anitahassanandani/ig)