Lip Care Tips : फाटलेले ओठांच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी हा लिप मास्क अतिशय प्रभावी आहे!
हिवाळा किंवा उन्हाळा अशा जवळपास प्रत्येक ऋतूत काही लोकांचे ओठ कोरडे आणि फाटलेले दिसतात. केवळ थंड हवाच नाही तर गरम हवा आणि सूर्यप्रकाशामुळेही ओठ फुटू शकतात. याशिवाय नेहमी लिपस्टिक लावल्यानेही ओठ क्रॅक होऊ शकतात. ओठ खूप संवेदनशील असतात, म्हणून त्यांना अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. हवामान कोणतेही असो, वेळोवेळी स्क्रब करत राहिल्यास, चेहऱ्यासह मॉइश्चरायझ ठेवत राहिल्यास या समस्येवर मात करणे तितकेसे अवघड नाही. फाटलेल्या ओठांची समस्या सोडवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1 टीस्पून मध, 1 टीस्पून कोरफड जेल, 1 टीस्पून नारळ तेल, 1/2 तुकडा कच्ची हळदलिप मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्ची हळद गॅसवर मंद आचेवर भाजून घ्या.(Photo Credit : pexels )
त्यानंतर किसून घ्या.नंतर नारळाचे तेल कोमट करून एका बाऊलमध्ये काढून त्यात किसलेली हळद घाला. (Photo Credit : pexels )
नंतर त्यात मध आणि कोरफड जेल घाला. हा लिप मास्क तुम्ही एका कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता.(Photo Credit : pexels )
लिप मास्क लावण्यापूर्वी ओठ स्क्रब करावे लागतात, त्यासाठी एका बाऊलमध्ये साखर आणि लिंबाचा रस घालून स्क्रबिंग करावे.(Photo Credit : pexels )
सुमारे 1 मिनिट चोळा आणि नंतर धुवा. ओठ जास्त फाटलेले असतील तर आरामात स्क्रब करा.(Photo Credit : pexels )
त्यानंतर हा लिप मास्क लावा आणि 15 मिनिटे ठेवा. यानंतर कोमट पाण्यात स्वच्छ कापड भिजवून ओठ पुसून घ्यावेत.हा मास्क दररोज वापरा. लवकरच या समस्येवर मात होईल.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )