Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tips to Improve Eyesight : दृष्टी वाढवून चष्म्याची संख्या कमी करण्यासाठी हे मार्ग प्रभावी आहेत !
लहान वयात जाड चष्मा घालणे ही आजची सामान्य प्रथा झाली आहे. खाण्यापिण्यापासून ते जीवनशैलीपर्यंत खराब जीवनशैलीचा परिणाम थेट डोळ्यांच्या दृष्टीवर होतो. तुम्हालाही आपल्या चष्म्याची संख्या कमी करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही जुना चष्मा देखील काढू शकाल. त्यांच्याविषयी उशीर न करता जाणून घेऊया.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदृष्टी वाढविण्यासाठी 20-20-20 हा नियम अतिशय प्रभावी मानला जातो. यामध्ये मोबाइल किंवा लॅपटॉपवर काम करताना दर 20 मिनिटांनी 20 सेकंद नजर हटवून 20-25 फूट अंतरावरील एखाद्या गोष्टीकडे पहावे लागते. हा एक व्यायाम आहे, ज्यामुळे चष्म्याची संख्या देखील कमी होऊ शकते.(Photo Credit : pexels )
डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये पुरेसे पोषण असते. अशा वेळी लिंबूवर्गीय फळे, हिरव्या पालेभाज्या, अंडी, शेंगदाणे, बीन्स इत्यादी पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करावा.(Photo Credit : pexels )
शरीर निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या व्यायामाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे डोळे निरोगी आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी आपण घरीही त्याच्याशी संबंधित काही सोपे व्यायाम करून पाहू शकता. (Photo Credit : pexels )
जसे डोळे फिरवणे, दूरच्या एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवणे, इत्यादी. या व्यायामाचे नियमित पालन केल्यास चष्म्याची संख्या बऱ्याच अंशी कमी करता येते.(Photo Credit : pexels )
तुम्हालाही बराच वेळ मोबाईलस्क्रीनला चिकटून राहण्याची सवय आहे, त्यामुळे जाणून घ्या की हा आयसाइटचा सर्वात मोठा शत्रू आहे. अशावेळी चष्मा काढायचा असेल तर या गोष्टींपासून अंतर ठेवून वेळोवेळी डोळ्यांना विश्रांती देणं गरजेचं आहे (Photo Credit : pexels )
आणि तसेच डोळ्यांची नियमित तपासणी करायला विसरू नका. याशिवाय डोळ्यांचे धुळीपासून संरक्षण करणे, नियमित धुणे आणि स्वच्छ रुमाल वापरणे देखील खूप महत्वाचे आहे.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )