Ram Charan Birthday: जाणून घेऊया राम चरण आणि उपासना यांच्या खास प्रेमकथेबद्दल!
साऊथचा सुपरस्टार अभिनेता राम चरणचे जगभरात चाहते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराम चरणच्या RRR या चित्रपटाला केवळ दक्षिणेतच नव्हे तर जगभरातून भरभरून प्रेम मिळाले आहे.
राम चरण केवळ अभिनेताच नाही तर एक चांगला नवराही आहे.
राम चरण आणि उपासना यांची प्रेमकथा खूप खास आहे. दोघांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली.
राम चरण आणि उपासना यांची प्रेमकथा शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' सारखी आहे. दोघांची पहिली भेट कॉलेजच्या दिवसात झाली होती.
दोघेही कॉलेजमध्ये चांगले मित्र होते, पण मैत्रीपूर्वी त्यांच्यात खूप भांडण व्हायची. त्यानंतर दोघेही पक्के मित्र बनले.
राम चरण शिकण्यासाठी परदेशात गेल्यावर दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते.
परदेशातून परतल्यानंतर राम चरण यांनी उपासनाकडे प्रेम व्यक्त केले.
यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. राम चरणचा पहिला चित्रपट मगधीरा रिलीज झाल्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या मीडियात आल्या होत्या.
दोघांनी 2011 मध्ये एंगेजमेंट केली होती. 2012 मध्ये त्यांचे लग्न झाले.
राम चरण आणि उपासना 20 जून 2023 रोजी आई-वडील झाले. उपासना यांनी मुलीला जन्म दिला होता.