Blood Purifier : हे पदार्थ नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध करतात, तसेच अनेक आजारांपासूनही संरक्षण करतात!
निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरात असलेले रक्त स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तातील अमिनो अॅसिड, ग्लुकोज, प्रथिने, हार्मोन्स, ऑक्सिजन आणि पाणी या पोषक घटकांच्या मदतीने आपल्या शरीरातील अवयवांना पोषण मिळते. इतकंच नाही तर लघवी, घाम इत्यादी स्वरूपात शरीरात असलेले घाणेरडे आणि विषारी पदार्थ बाहेर काढून रक्त आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र काही कारणांमुळे रक्त अशुद्ध होते, ज्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी निरोगी राहण्यासाठी आपले रक्त स्वच्छ करणे गरजेचे आहे. आपण काही पदार्थांच्या मदतीने रक्त शुद्ध करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही पदार्थांबद्दल जे शरीरातील रक्त नैसर्गिक पद्धतीने शुद्ध करतील आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील.(Photo Credit : pexels )
अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांनी समृद्ध असलेला लसूण आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करते. हे आपल्या रक्तातील एकूण सीरम कोलेस्ट्रॉल आणि खराब एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )
आले हे रक्ताला गोठण्यापासून प्रतिबंधित करते आणि नैसर्गिक मार्गाने रक्त पातळ ठेवण्यास मदत करते.(Photo Credit : pexels )
गूळ हा लोहयुक्त असतो. तसेच आपली पचनशक्ती संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, त्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्त स्वच्छ राहते.(Photo Credit : pexels )
हळद म्हणजे एक अद्भुत नैसर्गिक उपचार आहे, जे यकृताच्या आरोग्यासाठी टॉनिक म्हणून कार्य करते. तसेच दुधात मिसळल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.(Photo Credit : pexels )
सफरचंद, नाशपाती आणि पेरू सारख्या फळांमध्ये असलेले पेक्टिन रक्तातील हानिकारक चरबी कमी करते आणि जड धातू आणि रसायने काढून टाकते, ज्यामुळे नैसर्गिक मार्गाने रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे ही फळे रोज खा.(Photo Credit : pexels )
गरम पाण्यात लिंबू मिसळून पिल्याने शरीर डिटॉक्स होते, ज्यामुळे रक्तही शुद्ध होते.(Photo Credit : pexels )
हिरव्या पालेभाज्या अँटीऑक्सिडेंटयुक्त असतात. याशिवाय जीवनसत्त्व ए, सी आणि बी, फॉलिक अॅसिड, लोह आणि त्यात असलेले इतर पोषक घटक नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )