Rohit Shetty Birthday: एकेकाळी 35 रुपये कमावणारा रोहित शेट्टी आज आहे जवळपास 300 कोटींचा मालक!
बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत ज्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.(all pc:रोहित शेट्टी/insta )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयांच्या संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या यादीत चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या नावाचाही समावेश आहे.
एकेकाळी 35 रुपये कमावणारा रोहित आज जवळपास 300 कोटींचा मालक आहे.
अजय देवगणच्या 'फूल और कांटे' या पहिल्या चित्रपटापासून रोहितचा चित्रपट निर्माता म्हणून प्रवास सुरू झाला.
या चित्रपटाशी ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जोडले गेले होते. वयाच्या 17 व्या वर्षापासून चित्रपटांमध्ये असिस्ट केल्यानंतर, रोहित शेट्टीने 2003 मध्ये दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले.
'जमीन' चित्रपटात त्याचा पहिला हिरो अजय देवगण होता. यानंतर रोहित शेट्टीने मेहनत करण्यापासून कधीच पाठ फिरवली नाही .
रोहित शेट्टीचा पहिला पगार फक्त 35 रुपये होता. पण आज तो एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी रुपये घेतो.
दिग्दर्शकाने 'गोलमाल', 'चेन्नई एक्सप्रेस', 'सिंघम' सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
रोहितच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शेटची एकूण संपत्ती 328 कोटी रुपये आहे. इंडस्ट्रीतील महागड्या दिग्दर्शकांमध्ये या दिग्दर्शकाच्या नावाचा समावेश होतो.