Dry Fruits : मधुमेहाच्या रुग्णांनी ' हे ' ड्राय फ्रुट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर !
ड्रायफ्रुट्समध्ये पिस्ता खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये फायबर, लोह, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, जे शरीराला आतून मजबूत करते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधुमेहाच्या रुग्णांसाठी हे ड्रायफ्रुट्स औषधापेक्षा कमी नाही. पिस्त्याचे फायदे जाणून घेऊया...[Photo Credit : Pexel.com]
पिस्त्याचे सेवन मधुमेहामध्ये फायदेशीर आहे : पिस्ता हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधासारखे आहे. हे चयापचय स्थिती सुधारण्यासाठी कार्य करते. [Photo Credit : Pexel.com]
हे खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहामध्ये खूप मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांनी पिस्ते नियमित खावेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. [Photo Credit : Pexel.com]
हृदयरोग प्रतिबंधित करते : पिस्त्याच्या कार्डिओ प्रोटेक्टिव ॲक्टिव्हिटीमुळे कधीही हृदयविकार होत नाही. पिस्ते कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात. त्यात असे अनेक गुणधर्म आढळतात, जे माणसाला हृदयरोगी होण्यापासून वाचवतात. [Photo Credit : Pexel.com]
शरीरातील सूज कमी करा : पिस्त्यामुळे शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ कमी होण्यास मदत होते. पेशी तुटणे किंवा दुखापत झाल्यामुळे होणारी सूज हाताळण्यासाठी पिस्ते दुधात उकळून घ्यावेत. हे जबरदस्त फायदे प्रदान करू शकते. [Photo Credit : Pexel.com]
हाडे मजबूत करणे : शरीरातील हाडे मजबूत करण्यात पिस्ता महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामध्ये कॅल्शियमची चांगली मात्रा आढळते, ज्यामुळे हाडे स्टीलसारखी बनू शकतात.पिस्त्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे देखील आढळतात, ज्यामुळे शरीर मजबूत आणि निरोगी बनते. [Photo Credit : Pexel.com]
आपले डोळे निरोगी ठेवा : पिस्त्यात अँटिऑक्सिडंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आढळतात, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
याचे नियमित सेवन केल्यास मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या तीव्र आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, दुधात उकळल्याने पिस्त्याची क्षमता आणखी वाढते, जे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]