Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madhurani Prabhulkar : अन् मधुराणी प्रभुलकर बनली अरुंधती..
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या सुपरहिट मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) घराघरांत पोहोचली आहे. (photo:madhurani.prabhulkar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने साकारलेली आई चांगलीच गाजली.(photo:madhurani.prabhulkar/ig)
तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. अरुंधतीची भूमिका कशी मिळाली यासंदर्भातली पोस्ट या मालिकेच्या लेखिका रोहिणी निनावे (Rohini Ninawe) यांनी लिहिली आहे. (photo:madhurani.prabhulkar/ig)
रोहिणी निनावे यांनी लिहिलं आहे,आज मधुराणीचा वाढदिवस.. मधुराणी माझी खूप जवळची वगैरे मैत्रीण नाही ... पण मला ती आधीपासून आवडायची.. अगदी सात्विक गोड चेहरा.. वैविध्यपूर्ण कवितांमध्ये तिला असलेला रस आणि अत्यंत प्रभावी सादरीकरण यामुळे ती माझी आवडती होती.. आणि तिच्या छंदामध्ये ती रममाण झाली होती.. अशातच आई कुठे काय करते ही मालिका माझ्याकडे लिहायला आली होती .. तेव्हा त्या भूमिकेसाठी मधुराणी डोळ्यासमोर आली. (photo:madhurani.prabhulkar/ig)
रोहिणी निनावे यांनी पुढे लिहिलं आहे,निर्माते राजन शाही यांना मी तिचे फोटो दाखवले.. मधुराणीशी सुद्धा बोलले. कारण तिने एवढ्यात मालिकांमध्ये काम केले नव्हते.. तीन मोठ्या मुलांच्या आईची भूमिका करण्यास ती काहीशी चाचरत होती. अर्थात ती त्या वयाची नाहीच आहे. पण मी तिला समजावून सांगितलं की ही भूमिका अतिशय सुंदर असून यामध्ये अभिनयाला वाव आहे आणि एखाद्या चांगल्या मालिकेमध्ये मध्यवर्ती भूमिका केल्याने जी प्रसिद्धी तुला मिळेल त्याची तुला कल्पना सुद्धा नाही.. म्हणजे अभिनय केल्याचं आत्मिक समाधानही आणि प्रसिद्धीही. (photo:madhurani.prabhulkar/ig)
कदाचित तिला माझं म्हणणं पटलं असावं आणि तिने ही भूमिका करण्यास होकार दिला. नंतर ही मालिका किती लोकप्रिय झाली हे सगळ्यांना माहीतच आहे. काही कारणास्तव ही मालिका मी नंतर लिहीली नाही.. पण मधुराणीने ही भूमिका अमर केली याचा मला आनंद आहे.. मधुराणी आता पुन्हा आपल्या कविता वाचनाच्या आवडत्या छंदाकडे वळली आहे.. मधुराणी असंच तुला ज्यातून आनंद आणि यश मिळेल असं काम तुला मिळत राहो.. ही सदिच्छा !.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. (photo:madhurani.prabhulkar/ig)
मधुराणीची लेक लहान असल्याने तिची कोणत्याही बाबतीत गैरसोय होऊ नये म्हणून तिने 'आई कुठे काय करते' ही मालिका करण्यास नकार दिला होता. लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची मधुराणीची इच्छा होती. (photo:madhurani.prabhulkar/ig)
त्यामुळे तिने 'आई कुठे काय करते' ही मालिका करण्यास नकार दिला होता. मालिका करण्यास माधुरीने नकार दिल्याचं तिच्या पतीला म्हणजेच प्रमोदला कळल्यानंतर त्याने तिची समजूत घातली आणि लेकीची काळजी नको करू मी घेईल तिची काळजी असं सांगितलं.(photo:madhurani.prabhulkar/ig)
पतीच्या सांगण्यावरुन माधुरीने नंतर 'आई कुठे काय करते' ही मालिका करण्याचं ठरवलं. (photo:madhurani.prabhulkar/ig)