Hot water at night : रात्री गरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे !
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत. गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबद्दल सर्व काही जाणून घ्या. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीर डिटॉक्स होते: कोमट पाणी प्यायल्याने वजन तर कमी होतेच पण शरीरातील घाणही निघून जाते. [Photo Credit : Pexel.com]
रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास किंवा झोपण्यापूर्वी एक किंवा दोन तास आधी कोमट पाणी प्या. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. यासोबतच शरीरातील घाणही बाहेर पडते. [Photo Credit : Pexel.com]
दिवसभर शरीर सक्रिय राहते: कोमट पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते. तसेच कोमट पाण्यात लिंबाचे 2 थेंब टाकल्यास शरीराला ऊर्जा मिळते. [Photo Credit : Pexel.com]
पोटाशी संबंधित समस्या दूर होतात: जर तुम्हाला पोट किंवा पचनाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर दररोज झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या. [Photo Credit : Pexel.com]
पोटाशी संबंधित अनेक आजार जसे की बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसशी संबंधित समस्या दूर होतील. गरम पाणी प्यायल्याने अन्न लवकर पचते. [Photo Credit : Pexel.com]
तणाव दूर होतो: रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या, यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होते. [Photo Credit : Pexel.com]
गरम पाणी प्यायल्याने मेंदू सक्रिय राहतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते. [Photo Credit : Pexel.com]
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील : वाढत्या सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या. त्यामुळे त्वचा घट्ट होऊ लागते.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]