Pain Relief :पायऱ्या चढताना आणि उतरताना पायात दुखतं त्यामुळे या व्यायामाने दूर करा ही समस्या!
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पायऱ्या चढणे आणि उतरणे हा एक चांगला व्यायाम मानला जातो. जो केवळ खालच्याच नव्हे तर वरच्या शरीरासाठीही उत्तम व्यायाम आहे, पण काही लोकांना पायऱ्या चढण्यात खूप त्रास होतो. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुणाचे पाय दुखत असतील तर कुणाला गुडघेदुखीचा त्रास होतो आणि जी एक सामान्य समस्या आहे ती म्हणजे श्वास ोच्छवासाचा त्रास. तुम्हालाही पायऱ्या चढायला त्रास होत असेल तर काही व्यायाम असे आहेत, ज्यांच्या रोजच्या सरावामुळे पाय आणि गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो. यासोबतच स्नायूही मजबूत होतात. (Photo Credit : pexels )
जर तुम्हाला पायऱ्या चढायला त्रास होत असेल तर तुम्ही रोज चेअर डिप्सचा सराव करू शकता. हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला फक्त खुर्चीची आवश्यकता असते. हे करणे खूप सोपे आहे. मात्र, सुरुवातीला तुम्हाला हा व्यायाम करण्यात अडचण येऊ शकते. चेअर डिप्स व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात. असे रोज केल्याने गुडघेदुखीतही आराम मिळतो.(Photo Credit : pexels )
स्क्वॅट्स केल्याने पायांचे स्नायू बळकट होतात. यामुळे वेदना आणि सूज यातही आराम मिळतो. स्क्वॅट्सपाय, गुडघे, कंबर आणि पोटाच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत करतात. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरणही वेगाने होते. (Photo Credit : pexels )
पायऱ्या चढताना पाय किंवा गुडघे दुखत असतील तर त्यावर मात करण्यासाठी साइड लेग लिफ्टचा व्यायामही खूप फायदेशीर ठरतो. ज्यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात. (Photo Credit : pexels )
तसेच चरबीही कमी होते. हे करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची देखील आवश्यकता नाही. या व्यायामाचा फरक तुम्हाला काही दिवसांतच दिसेल.(Photo Credit : pexels )
पायऱ्या चढताना हँडरेलिंगचा वापर करावा जेणेकरून गुडघ्यांवर जास्त दबाव येणार नाही.ब्रँडेड शूजच घाला. तसेच फिटिंग शूज घाला.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )