Breakfast In The Morning: दिवसभर शरीराला ऊर्जा देण्यासाठी या नाश्त्याची निवड करा!
सकाळी तुम्ही चविष्ट नाश्ता केला तर दिवसाची सुरुवात चांगली होते आणि संपूर्ण दिवस चांगला जाण्याची शक्यता बर्याच प्रमाणात वाढते. [Photo Credit :Pixel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1. कोमट पाणी: सकाळी पोटात जाणारी पहिली गोष्ट निवडावी तर ते पाणी आहे. दिवसाची सुरुवात पाण्याने केल्यास शरीराला दिवसभर हायड्रेशन मिळते. यासाठी सकाळी कोमट पाणी प्यावे. [Photo Credit :Pixel.com]
बदाम: तुमच्या दिवसाची सुरुवात रात्रभर पाण्यात भिजवलेल्या बदामांनी करावी. दररोज सकाळी काही सोललेले बदाम खा आणि त्यासोबत एक ग्लास दूध प्या. [Photo Credit :Pixel.com]
ओट्स: प्रथिने आणि फायबर समृद्ध असल्याने, ओट्स हे नाश्त्यासाठी खूप चांगले अन्न आहे. हे चयापचय वाढवते, ज्यामुळे सूज येणे, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. [Photo Credit :Pixel.com]
मनुका आणि खजूर: रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले मनुका आणि खारीक तुम्ही सकाळी नाश्त्यापूर्वी किंवा योगासन करण्याअगोदर , चालण्याआधी त्यांचे सेवन करू शकता.[ Photo Credit :Pixel.com]
पोहे: कमी खाण्यासाठी आणि जास्त वेळ पोटभरुन ठेवण्यासाठी पोहे हा उत्तम नाश्ता आहे. ते चरबी वाढवत नाही किंवा तयार होण्यास जास्त वेळ घेत नाही आणि फायबर समृद्ध आहे. [Photo Credit :Pixel.com]
अंडी: हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात पाणी पिऊन कराल आणि मग तुम्ही उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट वगैरे खाऊ शकता. [Photo Credit :Pixel.com]
केळी: हे असे फळ आहे जे तुम्ही रिकाम्या पोटीही खाऊ शकता. हे केळीमध्ये आढळणारे पोषक आणि संतुलित गुणधर्मांमुळे आहे. [Photo Credit :Pixel.com]
स्वादिष्ट नाष्ट्याने मनातील सकारात्मकताही वाढते. पण या सगळ्यासाठी तुम्ही नाश्त्यासाठी हेल्दी फूड निवडणे महत्त्वाचे आहे. [Photo Credit :Pixel.com]
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit :Pixel.com]