Bananas in winter : हिवाळ्यात केळी खावी का ? इथे उत्तर मिळेल !
हिवाळ्यात केळी खावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण बहुतेक लोक हिवाळ्यात केळी खाणे बंद करतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की असे करणे अजिबात योग्य नाही. केळी खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही. [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सर्दी, ऍलर्जी किंवा घशात किंवा नाकात संसर्ग झाला असेल तर केळी अजिबात खाऊ नका. रात्री चुकूनही मुलाला केळी खायला देऊ नका. [Photo Credit : Pexel.com]
केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. त्यामुळे केळी तुम्ही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. पण सर्दी-खोकल्याच्या वेळी चुकूनही केळी खाऊ नका. यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
हिवाळ्यात केळी खाण्याचे फायदे : केळी खाल्ल्याने हृदय निरोगी राहते:हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हिवाळ्यात केळी खाल्ल्यास ते त्यांच्यासाठी चांगले असते. [Photo Credit : Pexel.com]
केळ्यामध्ये उच्च फायबर असते ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. फायबर समृद्ध केळी हृदयाशी संबंधित आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]
यामध्ये असलेले पोटॅशियम हृदयाचे ठोके आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते. [Photo Credit : Pexel.com]
पोषक तत्व : केळ्यामध्ये कॅल्शियम तसेच पोटॅशियम, मँगनीज आणि लोह असते. [Photo Credit : Pexel.com]
मॅग्नेशियम, नियासिन, फोलेट, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जे शरीर आणि हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात सांधेदुखीही बरी होते. [Photo Credit : Pexel.com]
गोड खावेसे वाटत असेल तर केळी खाऊ शकता. हे खाल्ल्यानंतर तुमची गोड हौस भागते. त्याचबरोबर भूक नियंत्रित ठेवते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]