PHOTO : सैंधव मीठ : सामान्य मीठापेक्षा जास्त खनिजांचा स्त्रोत
काळे मीठ ज्याला सैंधव मीठ असे देखील म्हणतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सामान्य मीठापेक्षा 84 पट जास्त खनिजे असतात. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ त्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. याचेपाणी अधिक फायदेशीर आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपचन व्यवस्थित होते : खारट पाणी पोटाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी खारट पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल वाढते, जे अन्न तुटण्यास आणि शोषण्यास मदत करते. यामुळे अपचन, फुगवणे, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.com]
मेटबॉलीजम वाढण्यास उपयुक्त सैंधव मीठाच्या खाऱ्या पाण्याचे सेवन केल्यास चयापचय क्रिया वाढते. यामुळे मधुमेहासारख्या चयापचय समस्या दूर राहतात. चयापचय गती वाढल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे चरबी लवकर कमी होते. [Photo Credit : Pexel.com]
शरीर डिटॉक्स करते : सैंधव मीठ शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य वाढवते. यामुळे शरीरातील घाण निघून जाते. ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार बरे होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर करते : सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह सारखी 84 खनिजे या मीठात आढळतात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात. शरीरात इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे सतत थकवा, अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात.त्या दूर केल्या जातात . [Photo Credit : Pexel.com]
तणाव मुक्तता : मीठाचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे पाणी मानसिक समस्या दूर ठेवू शकते. हे प्यायल्याने तणाव कमी होतो आणि तणावासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.com]
याचबरोबर निरोगी फुफ्फुसे, मजबूत हाडे, पीएच पातळीमध्ये संतुलन,निरोगी आणि ताजी त्वचा हे देखील मीठाचे पाणी पिण्याचे फायदे आहेत . [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]