Excessive use of Earphones : इअरफोन किंवा इअरबड्सचा अतिवापर असा ठरेल हानिकारक!
लोकांना मोठ्या आवाजात गाणी ऐकायला आवडतात, पण तुम्हाला माहीत आहे का की मोठ्या आवाजात गाणी ऐकणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की इअरफोन किंवा इअरबड्सच्या अतिवापरामुळे धोकादायक ठरू शकते. [Photo Credit:Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइअरफोनच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की मोठ्या आवाजात इअरफोन वापरल्याने ऐकण्याची शक्ती कमी होते. [Photo Credit:Pexel.com]
याशिवाय यामुळे डोकेदुखी आणि चक्कर येणे देखील होऊ शकते, एअर फोनमुळे कानात बॅक्टेरिया आणि घाण जमा होऊ शकते, ज्यामुळे कानात संसर्ग होण्याची शक्यता असते. [Photo Credit:Pexel.com]
सतत मोठ्या आवाजात इअरफोन लावल्याने बहिरेपणा, डोकेदुखी, इन्फेक्शन, मेंदूचे नुकसान इत्यादी समस्या उद्भवू शकतात.[Photo Credit:Pexel.com]
हे आजच थांबवायला हवे, अन्यथा त्यामुळे होणारे अनेक गंभीर आजार तुम्हाला घेरू शकतात.[Photo Credit:Pexel.com]
अशा प्रकारे सतत कानात इअरफोन लावल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते. असे केल्याने तुम्हाला त्याचे व्यसन लागू शकते. [Photo Credit:Pexel.com]
या आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काही उपाय करावेत जसे की कमी आवाजात इअरफोन वापरा. [Photo Credit:Pexel.com]
झोपताना इअरफोन दूर ठेवा, वारंवार कान स्वच्छ करत राहा, प्रत्येक दिवशी इअरफोन स्वच्छ वापरा . [Photo Credit:Pexel.com]
इअरफोन 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापरू नका. हे सर्व उपाय करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.[Photo Credit:Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit:Pexel.com]