प्रशिक्षकानं तो चेंडू पाहिला अन् थेट कोहलीच्या विकेटचा डाव टाकला; सिद्धार्थने दिलेला शब्द पूर्ण केला!
आयपीएल 2024 च्या हंगामात काल लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. (Image Source-IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखनौच्या युवा गोलंदाजांनी आरसीबीला नमवले. यामध्ये वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि फिरकीपटू मणिमारन सिद्धार्थ यांचा समावेश आहे. (Image Source-IPL)
मणिमारन याने आरसीबीविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि आयपीएलमधील पहिली विकेट विराट कोहलीची घेतली. (Image Source-IPL)
मणिमारन सिद्धार्थसाठी विराट कोहलीची विकेट खास होती कारण त्याने लखनौ संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगरला हे वचन दिले होते. (Image Source-IPL)
सामन्यानंतर लखनौने सोशल मीडियावर संघाच्या ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ पोस्ट करून याचा खुलासा केला. (Image Source-IPL)
यामध्ये प्रशिक्षक लँगर यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी सिद्धार्थला सरावात 'आर्म बॉल' टाकताना पाहिले तेव्हा त्याने थेट विचारले की तो विराटची विकेट घेणार का? याला उत्तर देताना सिद्धार्थ एवढाच म्हणाला - 'येस सर' (Image Source-IPL)
मणिमारन सिद्धार्थ कोण आहे?- मणिमारन सिद्धार्थ हा डावखुरा असून ऑफस्पिन गोलंदाजी करतो. मणिमारनला लखनऊने 2024 च्या लिलावात 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मणिमारन सिद्धार्थने त्याच्या टी-20 च्या कारकिर्दीत 7 सामने खेळताना 6.5 च्या अविश्वसनीय गोलंदाजीच्या सरासरीने 18 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत खेळलेल्या 17 सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्येही तो तामिळनाडूकडून खेळताना दिसला होता. आतापर्यंतच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 7 सामन्यात 27 बळी घेतले आहेत. (Image Source- Social Media)