Healthy Kitchen Tips : या सोप्या स्टेप्सने बनवा तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ आणि हेल्दी!
स्वयंपाकघर ही सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह जागा आहे जिथून कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य तयार केले जाते. त्याचबरोबर अस्वास्थ्यकर स्वयंपाकघरात बॅक्टेरिया आणि फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरातील आपला बराचसा वेळ स्वयंपाकघरात जातो. सकाळच्या चहा-नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही इथे तयार केलं जातं. त्यामुळे आपण आपलं स्वयंपाकघर स्वच्छ आणि निरोगी ठेवणं गरजेचं आहे. स्वयंपाकघरात असलेल्या अनेक गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्या आजारांना कारणीभूत ठरतात.चला तर मग जाणून घेऊया याबद्दल काही टिप्स . (Photo Credit : pexels )
स्वयंपाकघरात प्लॅस्टिककंटेनर ऐवजी काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर घ्या . तसेच नॉन-स्टिक पॅनऐवजी स्टेनलेस स्टीलपॅनचा वापर करा . रिफाइंड तेलाऐवजी तूप वापरा.(Photo Credit : pexels )
नळाच्या पाण्याऐवजी ताजे पाणी वापरा.त्यानंतर जिथे लाकडी स्वयंपाकाची भांडी शक्य आहे, तेथे त्याचा वापर नक्की करा.वाफवणे किंवा उकळणे यासारख्या कमी चरबीयुक्त स्वयंपाकाची पद्धत वापरा. (Photo Credit : pexels )
रिफाइंड साखर ठेवू नका. त्याऐवजी गूळ किंवा मध वापरा, परिष्कृत धान्यांऐवजी संपूर्ण जाड धान्य वापरा आणि मीठ कमी प्रमाणात खा.(Photo Credit : pexels )
स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी हात धुवा तसेच स्वयंपाकघरात नखे कापून मगच अन्न शिजवा. (Photo Credit : pexels )
जेवताना शिंकताना किंवा खोकताना टॉवेल किंवा रुमाल वापरा, नेहमी स्वयंपाकघरात स्वयंपाक करतांना केस मागच्या बाजूला बांधून मगच अन्न शिजवावे.भाज्या आणि फळे नीट धुतल्यानंतरच त्यांचा वापर करा.(Photo Credit : pexels )
आपले सिंक चांगले स्क्रब करा त्यानंतर जर आपण चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर वापरानंतर ते चांगले धुवून वाळवा. अन्यथा, यामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग देखील होऊ शकतो.क्रॉस प्रदूषण टाळा. ब्रेड, पास्ता किंवा कोशिंबीरसोबत कच्चे मांस, सीफूड, पोल्ट्री यासारख्या वस्तू साठवू नका. नेहमी दूर ठेवा.(Photo Credit : pexels )
आपला फ्रिज नियमितपणे स्वच्छ करा. शिळे अन्न ठेवू नये, आपल्या पॅन्ट्रीतील सर्व अॅक्सेसरीज वेळोवेळी तपासून पहा. मुदत संपलेल्या वस्तू काढून टाका आणि दोन-तीन दिवसांतून एकदा डस्टबिन धुवून उन्हात वाळवावे. अन्यथा, ते बॅक्टेरियाचे घर देखील बनू शकते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )