Lip Blushing : ओठांचा रंग बदलण्यासाठी लिप ब्लशिंग हा एक चांगला पर्याय आहे, पण जाणून घ्या या संबंधित काही महत्त्वाची खबरदारी !
कुठे हलके, कुठे गडद किंवा पूर्ण पणे गडद ओठ आपले सौंदर्य कमी करण्याचे काम करतात. यासाठी नियमित स्क्रबिंग, मॉइश्चरायझिंग चा सल्ला दिला जातो, पण ज्यांना तसे करायला वेळ नाही त्यांच्यासाठी लिप ब्लशिंगचा पर्याय आहे. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआणि आता केवळ महिलाच नाही तर पुरुषांमध्येही लिप ब्लशिंगचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. (Photo Credit : pexels )
लिप ब्लशिंग ही कायमस्वरुपी ओठांच्या रंगाची प्रक्रिया आहे. ज्यामध्ये तज्ज्ञ सुईच्या साहाय्याने ओठांमधील रंग भरतात. बऱ्याच प्रमाणात, ही प्रक्रिया टॅटू काढण्यासारखीच आहे. यामुळे ओठांचा रंग बदलतो. ओठ पूर्वीपेक्षा जास्त गुलाबी, भरलेले आणि मुलायम दिसतात. या प्रक्रियेत फारसा त्रास होत नाही.(Photo Credit : pexels )
मात्र आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की आपण ओठ ब्लश झाल्यानंतर कमीतकमी 5 दिवस शॉवरमधून आंघोळ केल्यास चेहरा जास्त वेळ पाण्याखाली ठेवणे किंवा चेहरा धुणे टाळावे आणि आहारात जास्त मसालेदार, खारट पदार्थ खाणे टाळावे.(Photo Credit : pexels )
या सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे अन्यथा यामुळे ओठ सूजतात आणि फोड येऊ शकतात. होय, एखाद्या पार्टीला, इव्हेंटला जायचं असेल तर हलक्या रंगाचा मॅट फिनिशिंग लिप कलर लावू शकता. लिप ब्लश झाल्यानंतर नैसर्गिक ओठांचा रंग अधिक सुंदर दिसतो. यासाठी कोरल, गुलाबी, पीच असे रंग निवडा.(Photo Credit : pexels )
कायमस्वरूपी ओठांचा रंग चांगला परिणाम देतो यात शंका नाही, पण त्यानंतरही आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. लिप ब्लश झाल्यानंतर एसपीएफ सह लिप बाम वापरा. ज्यामुळे ओठ मऊ राहतील. आणि लिप ब्लश झाल्यानंतर ओठ स्क्रब करू नका.(Photo Credit : pexels )
लिप ब्लश झाल्यानंतर तुम्ही ट्रान्स्फरन्ट किंवा लाईट कलरची लिपस्टिक वापरू शकता . (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )