Health Tips : तुम्हाला माहिती आहे का ? जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यास कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही होऊ शकतो !
तासनतास बसून राहणे आता ही सामान्य बाब झाली आहे. ऑफिसमध्ये काम करणं असो, टीव्ही पाहणं असो किंवा सोशल मीडियावर वेळ घालवणं असो, बराच वेळ बसून राहणं हा आपल्या जीवनशैलीचा खास भाग बनला आहे.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र जास्त वेळ बसल्याने लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोकाही वाढतो, एवढेच नव्हे तर कॅन्सरसारखे धोकादायक आजारही होऊ शकतात.(Photo Credit : pexels )
जास्त वेळ बसल्याने शरीरात विविध प्रकारचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. कारण या सवयीमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो, चयापचयाचा वेग कमी होतो आणि शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते, या सर्वांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.(Photo Credit : pexels )
त्यामुळे सतत एकाच ठिकाणी बसून काम करणे टाळावे . कामाच्या व्यापामुळे सतत चालणे होत नसेल तर निदान काम करताना थोड्या थोड्या वेळाने शरीराला आराम देणे गरजेचे आहे. (Photo Credit : pexels )
कारण एकाच ठिकाणी बसून राहिल्याने शरीराची जास्त हालचाल होत नाही आणि त्यामुळे वजन वाढण्याची समस्या येऊ शकते . तसेच वजन वाढल्यानंतर कॅन्सरचा धोकाही वाढण्याची शक्यता असते . (Photo Credit : pexels )
जे लोक 8 तासांपेक्षा जास्त वेळ न चालता बसतात त्यांना फुफ्फुस, गर्भाशय आणि पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता असते आणि नियमित चालणाऱ्यांपेक्षा ती जास्त असते.(Photo Credit : pexels )
त्यामुळे जर तुम्ही एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम करत असाल तर थोड्या वेळाने उठून चालायला हवं आणि शरीराला थोडी विश्रांती द्यायला हवी. इतकंच नाही तर नियमित पणे काही व्यायाम किंवा योगा करा. यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होईल तसेच भयानक आजारांपासूनही बचाव होऊ शकतो. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )