Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rice Water : मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी 'तांदळाचे पाणी' रामबाण उपाय...
तांदळच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. तांदळाचे पाणी मुलायम आणि तजेलदार त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांगला तांदूळ १ वेळा पाण्यात स्वच्छ धुवा आणि त्यानंतर तो तांदूळ काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा.पाण्यात जो स्टार्च शिल्लक राहतो त्याला 'तांदळाचे पाणी' म्हणतात. (Photo Credit : unsplash)
तांदळाचे पाणी क्लिन्झर, टोनर, सीरम इत्यादी प्रकारे आपण वापरू शकतो. हे चेहऱ्यासाठी खूप फायदे होतात. (Photo Credit : unsplash)
तांदळाच्या पाण्यामध्ये गुलाबपाणी आणि मध टाकून त्याचा वापर आपण 'टोनर' म्हणून करू शकतो. (Photo Credit : unsplash)
तांदळाच्या पाण्यामध्ये 'व्हिटॅमिन ई' तेल मिसळून त्याचा वापर आपण 'सीरम' म्हणून करू शकतो. (Photo Credit : unsplash)
कोरफडीचा गर तांदळाच्या पाण्यात घालून तो 'फेस पॅक' चेहऱ्यावर लावल्यास त्वचा निरोगी राहते. (Photo Credit : unsplash)
चेहरा स्वच्छ करण्यासाठी तांदळाचे पाणी वापरल्याने सुरकुत्या,वृद्धत्वाची लक्षणे, काळे डाग, चट्टे,पिंपल्स कमी होतात. (Photo Credit : unsplash)
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेच्या पेशींना पोषण मिळते. त्वचेचं मृत पेशींपासून संरक्षण होते. त्वचेची पोत सुधारते आणि त्वचा निरोगी राहते. (Photo Credit : unsplash)
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी आणि चेहरा तजेलदार, मुलायम होण्यासाठी तांदळाच्या पाण्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे घाला. (Photo Credit : unsplash)
कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा, त्यामुळे चेहऱ्याला सर्वत्र पाणी नीट लागेल. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)