Home Remedies : वारंवार हातांची कातडी निघत आहे ? हे उपाय करा !
ही समस्या बहुतेक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. अनेक वेळा कपडे किंवा भांडी धुतल्यानंतर हात कोरडे होतात. हे टाळण्यासाठी लोक साधी क्रीम लावतात. [Photo Credit.Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, घरगुती उपाय करून तुम्ही या त्रासापासून कसा आराम मिळवू शकता. [Photo Credit.Pexel.com]
सूर्यप्रकाश, प्रदूषण, अत्याधिक स्वच्छता यामुळेही हाताची कातडी निघण्याची समस्या उद्भवू शकते. हात मऊ आणि गुळगुळीत करण्यासाठी काही उपाय आहेत.[Photo Credit.Pexel.com]
तुम्हाला मलई आणि मध मिसळून घरी एक मिश्रण तयार करावे लागेल, नंतर ते दररोज रात्री झोपण्यापूर्वी हातांना लावा. यामुळे तुमचे हात मऊ आणि लवचिक होतील.[Photo Credit.Pexel.com]
याशिवाय बटाट्याचा रस हातावर लावल्यास हाताशी संबंधित समस्या दूर होतात. लक्षात ठेवा की बटाट्याचा रस लावल्यानंतर 15-20 मिनिटांनी हात धुवा. [Photo Credit.Pexel.com]
एलोवेरा जेल हे हातांसाठी देखील वरदान आहे. हे जेल हातावर लावून मसाज करा तुम्हाला आराम मिळेल. [Photo Credit.Pexel.com]
तिळाचे तेल हलके गरम करून हातावर लावल्यानेही हात मऊ होतात.[Photo Credit.Pexel.com]
हाताची ही समस्या दूर करण्यासाठी एक चमचा साखरेत लिंबाचा रस मिसळा आणि हातांना लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा, नंतर हात धुवा. [Photo Credit.Pexel.com]
याशिवाय हातांची टॅनिंग दूर करण्यासाठी हातावर दही आणि केळीचे मिश्रण लावा आणि रोज रात्री साबणाने हात स्वच्छ धुवा. हातांवर रोज मॉइश्चरायझर लावा या उपायांचे नियमित पालन करून तुम्ही तुमचे हात मऊ ठेवू शकता.[Photo Credit.Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit.Pexel.com]