Drinking Lack of water : तुम्ही कमी पाणी पिता ? असे होईल आरोग्याचे नुकसान !
यामुळे इलेक्ट्रोलाइट्समध्ये असंतुलन होते.पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराला थकवा येऊ शकतो. त्यामुळे शरीर अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीर अशावेळी नीट कार्य करू शकत नाही आणि अनेक शारीरिक बदल देखील होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
मानसिक आरोग्य बिघडू शकते :अगदी सौम्य निर्जलीकरण देखील मानसिक आरोग्य बिघडू शकते. निर्जलीकरण म्हणजेच पाण्याच्या कमतरतेमुळे लक्ष न लागणे,तात्पुरती स्मरणशक्ती कमी होणे. [Photo Credit : Pexel.com]
तसेच नैराश्य आणि थकवा येऊ शकतो याचे कारण असे की निर्जलीकरणामुळे मेंदूतील रक्त परिसंचरण कमी होते, ज्यामुळे काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]
पोटाचे खराब आरोग्य: पाणी पचन आणि जठरांत्राचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या देखील उद्भवतात.त्यामुळे आणखी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.मूळव्याधची समस्याही वाढू शकते. [Photo Credit : Pexel.com]
किडनी नीट काम करत नाही: रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्यासाठी आणि द्रव संतुलन राखण्यासाठी मूत्रपिंड जबाबदार असतात.जेव्हा आपण पाणी कमी पितो तेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही आणि लघवीचे उत्पादन कमी होते. [Photo Credit : Pexel.com]
ज्यामुळे शरीरात टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागतात.अशा परिस्थितीत दीर्घकाळापर्यंत डिहायड्रेशनमुळे किडनी स्टोन,यूटीआय आणि किडनी खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.[Photo Credit : Pexel.com]
पाणी न पिल्याने पुढील समस्या उद्भवू शकतात: सहज थकवा जाणवणे,कोरडी आणि निर्जीव त्वचा असणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन,मूत्रमार्गात संक्रमण,रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये समस्या असे परिणाम पाण्याच्या कमतरते मुळे होतात.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]