Lack of sleep: कमी झोप घेत आहात? आधी हे जाणून घ्या!
चांगल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीसोबतच चांगली झोप ही आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 7-8 तासांची झोप आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ अनेकदा सांगतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकमी झोप घेतल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. आजकाल प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य इतके व्यस्त असते की त्यांना झोपायला वेळच मिळत नाही.कमी झोपेमुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. [Photo Credit : Pexel.com]
जे लोक कमी झोपतात किंवा ज्यांना कमी झोप येते.त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही तुमच्या शरीराला पाहिजे तेवढी विश्रांती दिली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. [Photo Credit : Pexel.com]
वजन वाढण्याची समस्या: जर एखादी व्यक्ती 6 तासांपेक्षा कमी झोपली तर त्याला अनेक आजार होतात. उदाहरणार्थ, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. [Photo Credit : Pexel.com]
झोप कमी झाल्यास शरीरात कॉर्टिसॉल आणि लेप्टिन नावाच्या हार्मोन्सची पातळी वाढते. त्यामुळे जास्त भूक लागते आणि यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह होतो. [Photo Credit : Pexel.com]
कमकुवत प्रतिकारशक्ती :शरीराला आवश्यक तेवढी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे बॅक्टेरिया तसेच संसर्गाशी लढण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होईल. [Photo Credit : Pexel.com]
ज्यांच्या खाण्याच्या सवयी, झोप आणि जीवनशैली चांगली असते. त्याची रोगप्रतिकारशक्तीही व्यवस्थित काम करते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर ते झोपेच्या कमतरतेमुळे असू शकते. [Photo Credit : Pexel.com]
हे घडते कारण धोकादायक प्रथिने शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत. ज्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे मेंदूशी संबंधित सर्व आजारांचा धोका वाढतो.[Photo Credit : Pexel.com]
स्मरणशक्तीवर परिणाम: झोप कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात सूज येऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
हे घडते कारण धोकादायक प्रथिने शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत. ज्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे मेंदूशी संबंधित सर्व आजारांचा धोका वाढतो.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]