Cooling Face Packs : जाणून घ्या या फेसपॅकमुळे कडक उन्हाच्या ऋतूत त्वचेला थंडावा जाणवेल.
उन्हाळ्यात घराबाहेर पडताच चेहऱ्यावर जळजळ झाल्यासारखं वाटतं. कडक सूर्यप्रकाशाचा परिणाम सर्वप्रथम आपल्या त्वचेवर दिसून येतो. यामुळे त्वचा डिहायड्रेट होऊ शकते, त्यामुळे त्वचेची विशेष काळजी (समर स्किनकेअर) आवश्यक असते. कडक सूर्यप्रकाशामुळे सनबर्न, त्वचेवर पुरळ, चिडचिड अशा समस्या उद्भवू शकतात.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कारणांमुळे त्वचेची नैसर्गिक चमक हरवू शकते आणि त्वचेचे आरोग्यही बिघडू लागते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या स्किनकेअरमध्ये थंडावा आणि हायड्रेशनकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही कूलिंग फेस पॅक सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने त्वचा थंड होईल आणि तुम्ही ते अगदी सहजपणे तुमच्या घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यासाठी काही कूलिंग फेसपॅक.(Photo Credit : pexels )
मुलतानी क्ले फेसपॅक त्वचेला थंडावा देतो आणि त्वचेच्या मृत पेशी साफ करण्यास देखील मदत करतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी मुलतानी मातीत गुलाबजल मिसळून संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावावे. त्यानंतर15 मिनिटे पाण्याने चेहरा धुवून घ्या.(Photo Credit : pexels )
चंदन त्याच्या कूलिंग इफेक्टसाठी ओळखले जाते. हा फेसपॅक बनवण्यासाठी चंदनाची पावडर घेऊन त्यात गुलाबजल आणि मध घाला. हे आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने चांगले धुवा. चंदन सनबर्नपासून मुक्त होण्यास खूप मदत करते.(Photo Credit : pexels )
कोरफड आणि काकडी, दोघेही खूप हायड्रेटिंग आणि थंड आहेत. फेसपॅक बनवण्यासाठी अर्धी काकडी ब्लेंड करा किंवा किसून घ्या. यानंतर त्यात कोरफड जेल घालून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 10-15 सोडल्यानंतर चेहरा धुवावा. कोरफड जेल त्वचेवरील पुरळ आणि सनबर्न बरा करण्यास खूप मदत करते.(Photo Credit : pexels )
टोमॅटो आणि दही स्किनकेअरसाठी खूप फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक टोमॅटो किसून त्यात दही आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. टोमॅटो टॅनिंग दूर करण्यास मदत करते आणि दही त्वचा थंड ठेवते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )