kiwi in winter Benefits : हिवाळ्यात 'किवी' फळ खाण्याचे हे आहेत फायदे
किवीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आता प्रश्न पडतो की हिवाळ्यात किवी कोणत्या कारणांसाठी खावी ते जाणून घेणार आहोत . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात सर्दी खोकला होत असतो अशा परिस्थितीत किवी तुम्हाला यापासून वाचवू शकते. कारण किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. [Photo Credit : Pexel.com]
किवी हे व्हिटॅमिन सी चे पॉवरहाऊस आहे. त्यात आवश्यक पोषक घटक असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. [Photo Credit : Pexel.com]
हिवाळ्यात व्हिटॅमिन सीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास सर्दी, खोकला आणि फ्लूपासून बचाव होतो. [Photo Credit : Pexel.com]
किवी फायबरचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. हिवाळ्यात आहारात फायबरचा अधिकाधिक समावेश केला पाहिजे, यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. [Photo Credit : Pexel.com]
किवीमध्ये असलेले पोटॅशियम आणि फायबर हृदयरोगाचा धोका दूर करते. पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
तर फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]
किवीमध्ये पॉलिफेनॉल आणि व्हिटॅमिन सीसह अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील फ्री रॅडिकल्सला प्रतिबंध करण्यास मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
ऑक्सिडेटिव्ह तणावापासून पेशींचे संरक्षण करण्यात आणि संपूर्ण आरोग्यास समर्थन देण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]