Detox Drinks : केवळ त्वचेची काळजी घेतल्याने चमकदार त्वचेची इच्छा पूर्ण होणार नाही, नैसर्गिक चमक हवी असेल तर प्या हे डिटॉक्स ड्रिंक्स !
महिला असो वा पुरुष, प्रत्येकाला चमकदार त्वचा हवी असते. अशावेळी असे काही डिटॉक्स ड्रिंक्स आहेत जे या कामात खूप उपयुक्त ठरतात. आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजकालच्या अनहेल्दी लाईफस्टाईलचा परिणाम फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही होतो. या ऋतूत तुमच्या त्वचेची चमकही कमी झाली आहे का? वरून कितीही स्किनकेअर केली तरी शरीर आतून स्वच्छ नसेल तर त्वचेवरही चांगले परिणाम दिसून येत नाहीत. (Photo Credit : pexels )
तुम्हालाही निर्जीव आणि निस्तेज त्वचा सुधारायची असेल तर येथे आम्ही तुम्हाला काही डिटॉक्स ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला त्वचेवर जादुई फायदे देतील.(Photo Credit : pexels )
डाळिंबाचा रस : अँटीऑक्सिडंट्स आणि जिवनसत्वाने समृद्ध डाळिंबाचे सेवन केल्याने आपली त्वचा निरोगी होते. वृद्धत्वाची चिन्हे कमी करून हे आपल्याला तरुण बनविण्याचे काम करते. दररोज शुद्ध डाळिंबाचा रस पिल्याने शरीरातील रक्तप्रवाह देखील सुधारतो आणि आपल्या त्वचेची चमक देखील वाढते.(Photo Credit : pexels )
लिंबाचे सरबत : लिंबूपाणी हे एक उत्तम डिटॉक्स पेय आहे. यात जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून रक्त स्वच्छ करून त्वचा आतून चमकदार होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )
जर आपण फायबरयुक्त चिया बियाणे पाण्यात भिजवून त्याचे सेवन केले तर ते डिटॉक्स ड्रिंकसारखे कार्य करते. यात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता असते, त्यामुळे चमकदार त्वचेची इच्छा सोडा, ते पिल्याने तुमचे केसही मजबूत होतात.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pexels )