Chapped Lips : जर हिवाळ्यात तुमचेही वारंवार फाटत असतील ओठ, तर जाणून घ्या काय आहेत यावर खास उपाय !
हिवाळ्याच्या ऋतूत त्वचा कोरडी पडू लागते, या कारणास्तव जर त्वचेला मॉइश्चरायझिंग केले नाही तर ती क्रॅक देखील होऊ शकते. हीच समस्या आपल्या ओठांच्या त्वचेची ही असते. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंड हवामानात ओठ फाटणे खूप सामान्य आहे, ज्यामुळे बर्याच लोकांना त्रास होतो. ही समस्या दूर करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धती आजमावतो, पण तरीही अनेकदा ही ओठ फाटण्याची समस्या कायम राहते.(Photo Credit : pexels )
त्यामुळे अनेकवेळा ओठांमधून किंवा काही तरी खातानाही रक्तस्त्राव होतो, हे खूप वेदनादायक असते. त्यामुळे ही समस्या कशी सोडवायची, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न ठरतो. मात्र यावर अनेक उपाय देखील आहेत ज्यामुळे ओठ फाटण्याची ही समस्या दूर होऊ शकते . (Photo Credit : pexels )
हिवाळ्यात वारंवार ओठ फुटणे ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे लोक बर्याचदा दुर्लक्ष करतात. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करू शकते. कधी कधी त्यात इतकी वाढ होऊ शकते की रुग्ण व्यापक पेरिओरल त्वचारोगाच्या तक्रारी घेऊन ओपीडीमध्ये येतात. (Photo Credit : pexels )
त्यामुळे हिवाळ्यात ओठांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. ओठाना क्रॅक होण्यापासून रोखण्यासाठी आपण घेऊ शकता अशी काही सोपी पावले आहेत, ज्यामुळे ते मऊ आणि कोमल राहतील. (Photo Credit : pexels )
ओठ मऊ ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करा. त्यांचा वापर केल्याने ओठांचा ओलावा शाबूत राहतो आणि ते फाटत नाहीत.(Photo Credit : pexels )
आपल्या त्वचेच्या इतर भागांप्रमाणेच ओठांना ही उन्हापासून संरक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे दिवसा लिप बाम वापरा, ज्यात एसपीएफ असते. हे अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून देखील संरक्षण करते.(Photo Credit : pexels )
जीभेने ओठ चाटण्याची अनेकांना सवय असते, जी तुमच्या ओठांसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. यामुळे, ओठ स्मॅकिंग त्वचारोग होऊ शकतो, ज्याचा उपचार करणे खूप कठीण होते. त्यामुळे ही सवय टाळली पाहिजे. (Photo Credit : pexels )
लिपस्टिक वापरणाऱ्या महिलांनी कोरड्या ओठांवर लिपस्टिक वापरणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. यामुळे ओठ फाटण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )