Kiwi Benefits : हाडे मजबूत करायची आहेत ? आजपासूनच हे फळ खाण्यास सुरुवात करा !
कालांतराने आपल्या शरीराची रचना बदलू लागते, जे हाडांमधील कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. हल्ली लहान वयातच उठताना, बसताना, चालताना अडचणींना सामोरे जावे लागते. या अवस्थेकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ते हाडांच्या आजाराचे रूप धारण करू शकते. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीराचा पाया हाडांवर अवलंबून असल्याने त्यांना बळकट करण्यासाठी आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. किवी हे फळ तुम्हाला यात मदत करू शकते. (Photo Credit : pexels )
किवी हे कॅल्शियम समृद्ध फळ आहे. एक कप किवीमध्ये 61.2 मिलीग्राम कॅल्शियम असते. अशावेळी याचे सेवन हाडांना आतून मजबूत करण्याचे काम करते.(Photo Credit : pexels )
ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात सारख्या आजारांमुळे होणाऱ्या समस्या वाढतात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी दररोज किवीचे सेवन करावे.(Photo Credit : pexels )
हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास किवीचे सेवन केल्याने खूप चालना मिळते.तसेच किवी हे फळ आपल्याला बऱ्याच रोग आणि संक्रमणांच्या जोखमीपासून वाचवू शकते.(Photo Credit : pexels )
किवी हे फळ जीवनसत्त्व सी आणि मॅग्नेशियममध्ये समृद्ध आहे जे शरीरात अँटीऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात आणि आपल्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करतात.(Photo Credit : pexels )
दररोज किवी या फळाचे सेवन केल्याने शरीरातील जीवनसत्त्व ए आणि कॅल्शियमची कमतरताही दूर होते, जे आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्याचे काम करते.(Photo Credit : pexels )
अशावेळी हाडे निरोगी ठेवायची असतील तर किवी या फळाला कोणत्याही स्वरूपात आहारात नक्कीच स्थान द्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोशिंबीर म्हणून किंवा स्मूदी बनवूनही याचे सेवन करू शकता. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )