Health Tips : जर तुम्हालाही दूध प्यायला आवडत नसेल तर कॅल्शियम सप्लीमेंट्ससाठी खा हे पदार्थ, मिळतील अनेक फायदे !
दूध आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम पुरवणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. मुलांच्या चांगल्या विकासासाठी त्यांना रोज दूध पाजले जाते कारण दूध हे शरीराला कॅल्शियम सप्लिमेंट्स देते . (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण काही लोकांना दूध पिणे अजिबात आवडत नाही किंवा काही लोक असे असतात ज्यांना दुधाची ॲलर्जी असते. अशा तऱ्हेने दुधाशिवाय शरीराला कॅल्शियमचा पूर्ण डोस कसा मिळणार, याची चिंता सतावत राहते . (Photo Credit : pexels )
दुधाव्यतिरिक्त सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. राजमा, चणे, लोबिया इत्यादी ,सोयाबीनमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि आपल्या दैनंदिन कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करू शकतात. 170 ग्रॅम सोयाबीनमध्ये दिवसाच्या कॅल्शियमडोसच्या 20 टक्के असू शकते. (Photo Credit : pexels )
जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही दररोज बदाम खाऊन कॅल्शियम सप्लीमेंट्स देखील घेऊ शकता. बदामामध्ये कॅल्शियम सोबतच हेल्दी फॅट, प्रोटीन आणि मॅग्नेशियम असते. रोज रात्री बदाम भिजवून सकाळी साल काढून खाल्ल्यास खूप फायदा होईल.(Photo Credit : pexels )
हिरव्या पालेभाज्या देखील कॅल्शियमचा चांगला डोस मानल्या जातात. रोज एक वाटी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यास कॅल्शियमचा चांगला डोस मिळू शकतो. यामध्ये पालकाच्या हिरव्या भाज्यांचा खूप फायदा होतो.(Photo Credit : pexels )
ड्रायफ्रूट्सच्या बाबतीत अंजीर कॅल्शियमने समृद्ध मानले जाते. वाळलेल्या अंजीराचे नियमित सेवन करून तुम्ही कॅल्शियम सप्लीमेंट्स घेऊ शकता. (Photo Credit : pexels )
जर तुम्ही ब्रोकोली कोशिंबीर खाल्ले तर तुम्हाला दररोज कॅल्शियमचा खूप चांगला डोस मिळेल. एक कप कच्च्या ब्रोकोलीमध्ये 35 मिलीग्राम कॅल्शियम असते. (Photo Credit : pexels )
दुधाऐवजी तुम्ही चण्याचे सेवन करून तुमच्या शरीराला कॅल्शियम सप्लिमेंट्स देखील देऊ शकता. 100 ग्रॅम हरभऱ्यात 150 मिलीग्राम कॅल्शियम असते. (Photo Credit : pexels )
शाकाहारी लोकांसाठी, सोयाबीन दुधानंतर कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि त्यासोबतच तुम्हाला लोह आणि प्रथिनांचा ही चांगला डोस मिळेल.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )