Ice Facial : चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी आईस फेशियलचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत!

सुंदर कोणाला दिसायचे नसते? आणि म्हणूनच लोक आपल्या चेहऱ्याकडे इतके लक्ष देतात. प्रदूषण, वाढते वय, कडक सूर्यप्रकाश आणि इतर अनेक कारणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग, मुरुम, पुरळ येऊ शकतात आणि चेहरा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतो.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हे टाळण्यासाठी आपण महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सपासून अनेक प्रकारचे फेशियल वापरतो आणि काय नाही, पण घरबसल्या सुंदर आणि चमकदार त्वचा मिळू शकते असं म्हटलं तर काय होईल, तेही पैसे खर्च न करता. हे आश्चर्यकारक वाटेल, परंतु आपली त्वचा आणखी सुधारण्यास मदत करण्याचा एक मार्ग आहे. आम्ही आइस फेशियलबद्दल बोलत आहोत.(Photo Credit : pexels )

सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्रींकडून ही आइस फेशियलचा वापर करण्यात आला आहे. तर आम्ही तुम्हाला त्याचे फायदे आणि ते घरी कसे करावे याबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया आइस फेशियलच्या फायद्यांविषयी.(Photo Credit : pexels )
थोडा वेळ चेहरा बर्फाच्या पाण्यात भिजवून ठेवणे किंवा सूती कापडात 2-4 बर्फाचे तुकडे गुंडाळून चेहऱ्यावर मसाज करणे याला आइस फेशियल म्हणतात. हे त्वचेचा फुगवटा कमी करण्यास मदत करते . (Photo Credit : pexels )
आईस फेशियल करण्यासाठी प्रथम एक मोठी वाटी किंवा कोणतेही खोल भांडे घ्या ज्यात आपण आपला चेहरा बुडवू शकता. आता या भांड्यात थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे घाला.(Photo Credit : pexels )
आता थंड पाणी आणि आईस क्यूबने भरलेल्या भांड्यात चेहरा 5ते 7 सेकंद बुडवून ठेवा आणि नंतर बाहेर काढा. ही प्रक्रिया 8 ते 10 मिनिटांच्या अंतराने कमीत कमी 5 वेळा करा. लक्षात ठेवा, चेहरा 20 सेकंदापेक्षा जास्त काळ पाण्यात बुडवू नका.(Photo Credit : pexels )
चेहरा पाण्यातून काढून टाकल्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने चेहरा कोरडा करावा. टॉवेलने चेहरा चोळणार नाही याची काळजी घ्या.आइस फेशियलच्या चांगल्या परिणामांसाठी जेड रोलर वापरा. हवं असेल तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवू शकता, जेणेकरून ते थंड होईल. उन्हाळ्यात खूप ताजेतवाने वाटते.(Photo Credit : pexels )
सकाळी आईस फेशियल चा वापर केल्याने चेहऱ्यावरील फुगवटा कमी होतो, विशेषत: डोळ्यांजवळ. यामुळे चेहरा कमी सुजलेला दिसतो.यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहरा सुधारतो.(Photo Credit : pexels )
ऑईल फेशियलमधील त्वचेची छिद्रे काही काळासाठी लहान केली जातात, जेणेकरून मेकअप चेहऱ्यावर सहज पणे लावला जातो.त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी आईस फेशियल देखील प्रभावी ठरू शकते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )