Depression in Kids : या कारणांमुळे तुमची मुलं डिप्रेशनला बळी पडू शकतात ,अशाप्रकारे ओळखा लक्षणे !
झपाट्याने बदलणारी जीवनशैली आजकाल लोकांना अनेक समस्यांना बळी पडत आहे. कामाचा वाढता ताण आणि इतर समस्यांमुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक समस्याही लोकांना ग्रासत आहेत. नैराश्य ही या समस्यांपैकी एक समस्या आहे, जी आजकाल बऱ्याच लोकांना प्रभावित करते. केवळ वयोवृद्धच नव्हे, तर हल्ली लहान मुलेही याला बळी पडत आहेत. गेल्या काही काळापासून मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर वेळीच नियंत्रण न मिळाल्यास ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. मुलांमध्ये नैराश्याची काही प्रमुख कारणे असू शकतात, ज्याची जाणीव झाल्यावर पालक आपल्या मुलांना त्यापासून वाचवू शकतात. अशातच आज आपण मुलांमधील नैराश्याच्या काही मुख्य कारणांबद्दल जाणून घेणार आहोत-(Photo Credit : pexels )
पूर्वीच्या काळी जिथे संयुक्त कुटुंबात राहण्याचा ट्रेंड होता, तिथे आता जास्त लोक न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात. संयुक्त कुटुंबात अनेकदा गदारोळ असायची आणि मुलांना आई-वडिलांबरोबरच आजी-आजोबा, काका, मावशी, यांचे ही प्रेम लाभले. मात्र, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आई-वडीलच एकत्र राहतात, जे बहुतेक कामानिमित्त बाहेर असतात. अशावेळी एकटेपणामुळे मुले नैराश्यग्रस्त होऊ शकतात.(Photo Credit : pexels )
मुलं चुकली म्हणून किंवा योग्य-अयोग्य सांगितल्याबद्दल पालक अनेकदा त्यांना शिवीगाळ किंवा फटकारतात. अशा तऱ्हेने अनेकवेळा पालकांचे हे वागणे मुलांच्या हृदयातील काट्यासारखे असते, ज्यामुळे त्यांचे कमकुवत मन खोलवर दुखावले जाते, जे हळूहळू त्यांना नैराश्याकडे ढकलते.(Photo Credit : pexels )
संयुक्त कुटुंबात वावरताना मुलांकडे आपल्या मनातील बोलण्यासाठी बरेच पर्याय असतात. मुले आपले विचार आई-वडिलांसह आजी-आजोबा, काका, मावशी आदींशी शेअर करत असत. मात्र, सध्या न्यूक्लिअर फॅमिलीमुळे मुले खूप एकटी पडली आहेत. पालकही कामाच्या निमित्ताने बहुतेक वेळा घराबाहेर असतात, ज्यामुळे मुले कोणाशीही आपले मन मोकळे करू शकत नाहीत आणि हळूहळू उदास होऊ लागतात.(Photo Credit : pexels )
जुन्या काळी मुले अनेकदा आपला मोकळा वेळ घराबाहेर मित्रांसोबत खेळण्यात घालवत असत. याउलट सध्या चे खराब वातावरण पाहता बहुतांश पालक मुलांना घराबाहेर पाठवणे टाळतात. अशा तऱ्हेने मुलांना स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी दिवसभर गॅझेट्सने घेरले जाते, त्यामुळे त्यांना नैराश्यही येऊ लागते.(Photo Credit : pexels )
मुलांमध्ये नैराश्याची लक्षणे : थकवा, मूड बदलतो,कमी ऊर्जा पातळी, झोपेची समस्या, नकारात्मक विचार, नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी खाणे, करमणुकीच्या उपक्रमांमध्ये रस नसणे इत्यादी . (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )