Protin for Vegetarians : शाकाहारी लोकांना 'या' पदार्थांमधून मिळेल प्रोटीन !

प्रोटीन असलेला आहार त्यांच्यासाठी कमी आहे परंतु कदाचित त्यांना माहित नसेल की असे काही पदार्थ आहेत जे प्रथिनांचे भांडार आहेत .याच्या सेवनाने शरीराला आवश्यकतेनुसार प्रथिने मिळतात. येथे जाणून घ्या शाकाहारी लोकांसाठी सर्वोत्तम प्रोटीन पदार्थ... [Photo Credit : Pixabay.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ब्रोकोली मध्ये प्रथिने जास्त प्रमाणात येते.एका मध्यम आकाराच्या ब्रोकोलीमध्ये सुमारे 4 ग्रॅम प्रथिने आढळतात. यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे शाकाहारी लोकांसाठी उत्तम आहेत, म्हणून ब्रोकोली खाणे फायदेशीर मानले जाते. [Photo Credit : Pixabay.com]

डाळ हा प्रत्येक शाकाहारीच्या थाळीचा एक भाग असतो.यामध्ये भरपूर प्रथिने देखील आढळतात. एक वाटी डाळ खाल्ल्यास 12 ग्रॅम प्रथिने मिळतात हे खाल्ल्याने शरीराला इतर अनेक पोषक तत्वे देखील मिळतात. कडधान्य आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले असतात. [Photo Credit : Pixabay.com]
दुग्धजन्य पदार्थ देखील शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे एक चांगले स्त्रोत आहेत. दूध, चीज आणि दही खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात. [Photo Credit : Pixabay.com]
यामुळे शरीरात कधीही प्रोटीनची कमतरता भासत नाही आणि शरीर मजबूत होते. त्यामुळेच आरोग्य तज्ञही दररोज दुग्धजन्य पदार्थ खाण्याची शिफारस करतात. [Photo Credit : Pixabay.com]
शाकाहारी लोक प्रोटीनसाठी सोयाबीन देखील खाऊ शकतात.त्यांच्या आहारासाठी प्रथिनांचा हा एक उत्तम पर्याय आहे. वनस्पती आधारित प्रथिने उत्तम आहेत. 100 ग्रॅम सोया चंक्समध्ये 36 ग्रॅम प्रोटीन असते. [Photo Credit : Pixabay.com]
शेंगदाणे प्रोटीनने भरलेले असतात. फक्त अर्धा कप शेंगदाण्यात सुमारे 20.5 ग्रॅम प्रथिने असतात.त्यात लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मँगनीज सारखे पोषक घटक देखील आढळतात,जे आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर मानले जातात.[Photo Credit : Pixabay.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pixabay.com]