Low Blood Pressure : कमी रक्तदाबाकडे दुर्लक्ष नको ; रक्तदाब नियंत्रणावर घरगुती उपाय
जर तुम्हाला असे वाटत असेल की कमी रक्तदाब ही इतकी मोठी समस्या नाही मात्र तुम्ही वेळेवर उपचार केले नाही तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनी निकामी होण्यासारख्या परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते. [Photo Credit :Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीरात असे आजार उद्भवतात ज्यांना आपण सामान्य समजतो आणि त्यांच्या उपचाराकडे लक्ष देत नाही. असाच एक आजार म्हणजे कमी रक्तदाब, जो जगभरातील अनेक लोकांना होत असतो . 120/80 mm हा नॉर्मल रक्तदाब असतो यापेक्षा कमी किंवा अधिक असल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते . [Photo Credit :Pexel.com]
कमी रक्तदाबाची सामान्य लक्षणे म्हणजे चक्कर येणे किंवा आजारी पडणे. कमी रक्तदाबाची समस्या घरच्या घरी देखील सोडविली जाऊ शकते, ती देखील काही घरगुती उपायांच्या मदतीने. [Photo Credit :Pexel.com]
कमी रक्तदाब होण्याची कारणे :पाण्याची कमतरता : जेव्हा शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही तेव्हा रक्ता कमी होऊ लागते. यामुळे, रक्तवाहिन्यांमधून रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे रक्तदाब कमी होतो. डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. [Photo Credit :Pexel.com]
हृदयाशी संबंधित समस्या: हृदयाशी संबंधित समस्या शरीरातील रक्ताभिसरणात अडथळा आणतात, ज्यामुळे कमी रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. जर हृदय योग्यरित्या कार्य करत नसेल, तर पुरेसे रक्त पंप करू शकत नाही, ज्यामुळे कमी रक्तदाब होऊ शकतो. [Photo Credit :Pexel.com]
पोषक तत्वांचा अभाव: व्हिटॅमिन बी 12 आणि लोहासारख्या काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, तुम्ही अॅनिमियाचा बळी होऊ शकता , ज्यामुळे कमी रक्तदाब होऊ शकतो. [Photo Credit :Pixabay.com]
कमी रक्तदाबावर उपाय काय आहेत ? मिठाचे सेवन वाढवा: रक्तदाब निरोगी ठेवण्यासाठी मीठ योग्य आणि पुरेशा प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. आपण आपल्या आहारात योग्य प्रमाणात मीठ देखील समाविष्ट केले पाहिजे. [Photo Credit :Pexel.com]
अधिक द्रव पदार्थांचे सेवन करा: शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. शरीरात पुरेसे पाणी राखण्यासाठी, शक्य तितक्या निरोगी द्रवपदार्थ प्या. हे तुम्हाला निर्जलीकरण होण्यापासून प्रतिबंधित करेल. [Photo Credit :Pexel.com]
तुळशीची पाने खा: तुळशीची पाने अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात भरपूर मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. शिवाय, युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट देखील आहे, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. [Photo Credit :Pexel.com]
रक्तदाब नियंत्रणासाठी हे उपाय मदत करतात तरीसुद्धा रक्तदाब अत्यंत कमी असल्यास तपासून त्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit :Pexel.com]