Apple Juice : सफरचंद रस नियमित प्या , होतील हे फायदे !
तुम्ही सफरचंद खूप खातात पण त्याचा रस कधी पिऊन पाहिला आहे का? सफरचंद खाण्यासोबतच त्याचा रस पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसफरचंद अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज एक ग्लास ज्यूस प्यायल्याने शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते.[Photo Credit : Pexel.com]
नाश्त्यात सफरचंद खाण्याऐवजी त्याचा रस पिऊ शकता. ज्यूस शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्यायल्याने चेहऱ्यावर चमक येते. सफरचंदाचा रस प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. [Photo Credit : Pexel.com]
सफरचंदाचा रस पिण्याचे फायदे : जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा ते नियंत्रित करण्यासाठी सफरचंदाचा रस फायदेशीर ठरतो. [Photo Credit : Pexel.com]
सफरचंदात अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त असतात. त्यामुळे सफरचंदाचा रस दररोज प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. [Photo Credit : Pexel.com]
यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. रोज ज्यूस प्यायल्यास डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव होतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होत नाही. [Photo Credit : Pexel.com]
सफरचंद अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यात पॉली-फिनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स देखील असतात. हे हृदयासाठी देखील खूप चांगले मानले जाते. [Photo Credit : Pexel.com]
रोज ज्यूस प्यायल्यास शरीरात पोटॅशियमची कमतरता भासणार नाही. सफरचंदाचा रस हृदयासाठी चांगला मानला जातो. [Photo Credit : Pexel.com]
जेव्हा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते, तेव्हा लोक लवकर आजारी पडू लागतात. स्वत:ला बळकट करण्यासाठी सफरचंदाचा रस रोज पिणे फार महत्वाचे आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए सोबत व्हिटॅमिन सी देखील असते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]