Health Tips : तुम्हीही सतत बाहेर खाता का ? स्ट्रीट फूडमध्ये वापरले जाणारे स्वयंपाकाचे तेल आरोग्यासाठी घातक !
स्ट्रीट फूडचा उल्लेख करताच आपल्या मनात चाट, पकोडे, रोल आणि बर्गरची चित्रे उमटू लागतात. हे स्वादिष्ट पदार्थ सर्वांनाच आवडतात, पण ते सर्व बनवण्यासाठी आपण वापरत असलेले तेल आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते, हेही लक्षात घेतले पाहिजे.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्ट्रीट फूड बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल बर्याचदा परिष्कृत आणि अत्यंत प्रक्रिया केलेले असते. वारंवार वापरल्यामुळे ही तेलांची गुणवत्ता कमी होते. (Photo Credit : pexels )
तसेच काही वेळा या तेलांवर विविध रसायनांमध्ये मिसळून प्रक्रिया ही केली जाते जेणेकरून ते अधिक दिवस टिकू शकेल .(Photo Credit : pexels )
स्ट्रीट फूड बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलांमध्ये ट्रान्स फॅट नावाचे हानिकारक फॅट्स जास्त प्रमाणात असतात.(Photo Credit : pexels )
संशोधनानुसार, तेल गरम केल्याने वारंवार अडाल्हाइड नावाचे हानिकारक रसायन तयार होते. हा एक प्रकारचा विषारी पदार्थ आहे जो आपल्या पेशींचे नुकसान करतो. (Photo Credit : pexels )
अशा तेलाच्या नियमित सेवनाने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो, विशेषत: फुफ्फुस आणि आतड्यांसंबंधी कर्करोग यामुळे जास्तप्रमाणात वाढण्याची शक्यता असते . (Photo Credit : pexels )
एकच तेल वारंवार तापवल्यास त्यात फ्री रॅडिकल्स नावाचे हानिकारक पदार्थ तयार होतात, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. ते आपल्या रक्तपेशींचे नुकसान करतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवतात.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )