Tea Side Effects: तुम्हीही जास्त चहा पिता का ? जाणून घ्या त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम !
चहा हे आपल्या देशात पिले जाणारे लोकप्रिय पेय आहे. इथे लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने होते, मग दिवसाची सांगता चहाची चुस्की घेऊन होते. इतकंच नाही तर ऑफिस आणि मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर चहाची फेरी सुरू असते. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेषत: हिवाळ्यातही लोक सतत चहा पितात. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.(Photo Credit : pexels )
जास्त प्रमाणात चहा पिल्याने आपल्याला अनेक आजार होण्याची भीती असते. कोणताही चहा, मग तो ग्रीन टी असो किंवा ब्लॅक टी, सर्व कॅफिनेटेड असते, ज्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर होतो. (Photo Credit : pexels )
रिफ्रेशमेंटच्या नावाखाली किंवा रात्री उशिरापर्यंत काम करण्याच्या बहाण्याने चहा पिणाऱ्यांमध्ये तुम्हीही असाल तर लगेच तुमची ही बदला ,कारण यामुळे होणारे नुकसान जाणून तुम्हीही थक्क व्हाल. (Photo Credit : pexels )
चवीसाठी कॅफिनयुक्त चहामध्ये साखर घातली जाते, ज्याच्या वारंवार सेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी असंतुलित होते. याचं कारण म्हणजे तुम्हाला डायबेटिसची समस्याही होऊ शकते. त्यामुळे त्याचे सेवन वारंवार करणे टाळावे.(Photo Credit : pexels )
चहाच्या अतिसेवनामुळे आधी चेहऱ्यावर बारीक रेषा येतात आणि मग या बारीक रेषा सुरकुत्यांमध्ये बदलतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा वयाने मोठे दिसता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वयापेक्षा वयाने मोठे दिसायचे नसेल तर जास्त चहा पिणे टाळा.(Photo Credit : pexels )
ब्लॅक टी किंवा ग्रीन टी दोन्हीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. कारण जास्त चहा पिल्याने आपल्याला वारंवार लघवी ची समस्या उद्भवते आणि जास्त लघवी आणि नंतर तेवढे पाणी न पिल्याने डिहायड्रेशन सुरू होते.(Photo Credit : pexels )
चहामध्ये साखर असते. जर तुम्ही एक कप चहामध्ये एक चमचा साखर घेऊन दिवसभरात चार ते पाच कप चहा पित असाल तर समजा की तुम्ही तीच चमचा साखर चहासोबत पिता, ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )