Teeth Whitening Tips: पिवळ्या दातांमुळे तुम्हीही चार जणांमध्ये मोकळेपणाने हसणे बंद केले का ? तर आजपासून फॉलो करा या टिप्स !
कारण आपले व्यक्तिमत्त्व केवळ त्वचा किंवा केसांवर अवलंबून नसते, तर दात निरोगी आणि स्वच्छ असणे देखील महत्वाचे आहे. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र तुम्हालाही पिवळ्या दातांची समस्या असेल आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने अवलंबण्याचा कंटाळा आला असेल तर आम्ही काही टिप्स शेअर करणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे दात दुधासारखे पांढरे देखील करू शकता. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी.(Photo Credit : pexels )
दात स्वच्छ आणि पांढरे करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर खूप प्रभावी आहे. यासाठी एका बाऊलमध्ये एक छोटा चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस मिसळून दातांना चांगली मसाज करा. एक दिवस वगळता प्रत्येक दुसऱ्या दिवशी असे केल्याने आठवडाभर दातांच्या रंगात बराच फरक दिसेल.(Photo Credit : pexels )
पिवळ्या दातांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. यासाठी तुम्हाला हे तेल थोड्या मीठात मिसळून ५ मिनिटे दात चोळावे लागतील.(Photo Credit : pexels )
जर तुम्हालाही पिवळ्या दातांची समस्या भेडसावत असेल तर तुम्ही दात दुधासारखे पांढरे करण्यासाठी दातुनचा वापर करून तुम्ही दात स्वच्छ करण्यास सुरुवात करू शकता. ही पद्धत थोडी संथ आहे, परंतु यामुळे आपले दात पांढरे होण्यास तसेच त्यांना मजबूत होण्यास खूप मदत होते.(Photo Credit : pexels )
याशिवाय दात पिवळसर होणे तसेच तोंडाची दुर्गंधी यामुळे त्रस्त असाल तर वेलची आणि लवंग सारख्या गोष्टीही तोंडात ठेऊ शकता. दिवसातून २-३ वेळा असे केल्याने दुर्गंधी दूर होते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )