Hindu temple in UAE : अबुधाबीमधील पहिल्या 'हिंदू' मंदिराचा 'पीएम मोदीं' च्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलं हिंदू मंदिर असलेल्या अबुधाबीमध्ये बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या हिंदू मंदिराचे लोकार्पण केले. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिर लोकार्पणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरात आभासी गंगा आणि यमुना नद्यांमध्ये जल अर्पण केले आणि नंतर मंदिराच्या प्रार्थना करण्यासाठी मार्गस्थ झाले. (Photo Credit : PTI)
अबू धाबीमध्ये 27 एकरच्या जागेवर गुलाबी वाळूच्या दगडातील मंदिर आहे, जे मध्य पूर्वेतील सर्वात मोठे मंदिर आहे. (Photo Credit : PTI)
इस्लाम हा UAE चा अधिकृत धर्म असताना, देशात सुमारे 36 लाख भारतीय कामगार राहतात. (Photo Credit : PTI)
मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांच्या यादीत भारतीय सरकारी अधिकारी, बॉलीवुड तारे आणि अब्जाधीश अंबानी कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. यावेळी अबुधाबीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. (Photo Credit : PTI)
अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुराणचा उल्लेख केला. (Photo Credit : PTI)
ते म्हणाले की, हे मंदिर जगाच्या विविधतेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती आणि अयोध्येतील राममंदिराबाबत देखील उपस्थितांना सांगितले. (Photo Credit : PTI)
दुबई-अबू धाबीतील हे मंदिर शेख झायेद महामार्गावरील अल रहबाजवळ 27 एकर जागेवर सुमारे 700 कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात आले आहे. (Photo Credit : PTI)
अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मंदिराच्या भिंतींवर केवळ हिंदू धर्माचे प्रतीकच नाही तर इजिप्शियन चित्रलिपी आणि कुराणातील कथा देखील कोरल्या आहेत. (Photo Credit : PTI)
ते पुढे म्हणाले की, हे मंदिर धर्मांमधील सद्भावना आणि जगाच्या एकतेचे प्रतीक बनेल. तसेच हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नसून मानवतेच्या समान वारसाचे प्रतीक आहे. (Photo Credit : PTI)