Health Tips : जास्त उकळलेला चहा बनू शकतो 'विष', थंडीत पिणे टाळा
चहा हा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. मात्र, हिवाळ्यातही जास्त चहा पिणे टाळावे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात जास्त चहा न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
बहुतेक लोकांना चहा प्यायला आवडतो. हिवाळ्याच्या मोसमात, बरेच लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात. काही लोक चहाशिवाय काही काळ जगू शकत नाहीत.
असे मानले जाते की हिवाळ्यात एक कप चहा अनेक रोग टाळू शकतो. चहा हा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते.
मात्र, हिवाळ्यातही जास्त चहा पिणे टाळावे. हिवाळ्यात जास्त चहा न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
आल्याचा चहा टाळा हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायल्याने आराम मिळतो. हे प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, शिवाय वारंवार लघवी होण्याच्या समस्येपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळतो.
मात्र, आल्याचा चहा न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. ते म्हणतात की, चहामध्ये आले, लवंगा आणि वेलची घालून जास्त वेळ उकळल्यास त्यात असलेले टॅनिन बाहेर पडतात.
ज्यामुळे आम्लपित्त निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे चहा जास्त वेळ न उकळण्याचा प्रयत्न करा.
एका दिवसात किती चहा प्यावा? तज्ज्ञांच्या मते, चहा दिवसातून दोन ते तीन वेळाच प्यावा. यापेक्षा जास्त चहा हानिकारक ठरू शकतो.
थंडीच्या मोसमातही चहा दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायला तरच चांगला समजला जातो, अन्यथा तो अपाय होऊ शकतो.