Blackness of Back : तुम्हालाही पाठीच्या काळेपणामुळे बॅकलेस कपडे घालता येत नाहीत का ? मग हा उपाय करा!
बॅकलेस ड्रेस घालायचा असेल तरच आपण बॅक क्लीनिंग आणि वॅक्सिंगवर भर देतो, पण बराच वेळ त्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केल्याने पाठ इतकी गडद होते की वॅक्सिंग आणि साफसफाई केल्यानंतरही फारसा फरक पडत नाही. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेहरा आणि हातांपेक्षा पाठ पूर्णपणे वेगळी दिसते. जर तुम्हीही लग्न समारंभात किंवा फंक्शनमध्ये बॅकलेस ड्रेस किंवा ब्लाऊज घालणार असाल तर या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची पाठ उजळवू शकता.(Photo Credit : pexels )
पाठीचा काळेपणा दूर करण्यासाठी कोरफड जेल अतिशय प्रभावी आहे. यासाठी एका बाऊलमध्ये सुमारे दोन चमचे कोरफड जेल काढून त्यात तेवढ्याच प्रमाणात लिंबाचा रस घालावा. (Photo Credit : pexels )
दोन्ही साहित्य चांगले फेटून मिश्रण तयार करा. या पेस्टने पाठीवर मसाज करा. आंघोळीपूर्वी याचा वापर करा आणि 10 मिनिटांनी आंघोळ करा. दैनंदिन वापराने काळी त्वचा उजळ होईल. (Photo Credit : pexels )
जेवणासोबतच मसूरडाळीचा वापर स्किनकेअरमध्येही केला जातो. यामुळे तुम्ही केवळ चेहराच नाही तर पाठीचा रंगही सुधारू शकता. (Photo Credit : pexels )
आधी मसूरडाळ बारीक करून पावडर बनवा. आता एका बाऊलमध्ये मसूर डाळीत दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. त्याचा प्रभाव आणखी वाढविण्यासाठी कोरफड जेल आणि दही देखील घातले जाऊ शकते. नंतर ते पाठीवर लावा आणि कोरडे झाल्यावर हलक्या स्क्रबिंगने धुवून टाका. (Photo Credit : pexels )
बेसनाचा वापर बराच काळ स्किनकेअरमध्ये केला जात आहे. त्वचा मऊ करण्यासाठी आणि रंग सुधारण्यासाठी बेसन खूप प्रभावी आहे. (Photo Credit : pexels )
पाठ उजळवण्यासाठी तुम्ही बेसनाचा ही वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये बेसन, दही, हळद आणि लिंबाचा रस किंवा गुलाबजल मिसळा. सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा. पाठीवर लावा आणि चांगले कोरडे होऊ द्या. आंघोळीपूर्वीही याचा वापर करा. काही आठवड्यांत तुम्हाला फरक दिसेल. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )