Overuse of Mobile : मोबाईलचा अतिवापर लहान मुलांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक ?
हल्ली तर अभ्यास, मित्रमैत्रीणींसोबत संवाद आणि मैदानी खेळ देखील मोबाईलमध्येच होतात. पण पालकांना हे माहित असणं फार गरजेचं आहे की मोबाईलच्या अतिवापराने मुलांना कोणते आजार होऊ शकतात आणि मोबाईल वापरणं हे मुलांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकते .[Photo Credit: Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याच्या मुलांना लहानपणापासून एक वेगळीच सवय लागते. त्यांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय ते जेवायलाच बसत नाही. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक आहे. तसेच एवढ्या लहान वयात मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलाभोवती अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो. [Photo Credit: Pexel.com]
जर मुलांना लहान वयातच मोबाईलची सवय लागली तर सगळ्यात पहिलं ते शिकतात मेसेज टाईप करायला. आपल्या आई वडिलांना पाहून त्यांना सुद्धा मेसेज पाठवण्याची सवय पडते. जस जसे मोठे होत जातात तस तशी चॅटिंगची सवय सुद्धा त्यांना लागते. पण यामुळे त्याला टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो. [Photo Credit: Pexel.com]
या विकाराला टीटीटी असेही म्हणतात. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय यामुळे नजर सुद्धा कमजोर होण्याची शक्यता असते . [Photo Credit: Pexel.com]
अनेक संशोधनातून हे दिसून आले आहे की मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर असतो.कारण पूर्ण दिवस फोनचा वापर केल्याने आणि सोशल मिडीयाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातले मित्र, खेळ यांच्या बाबतीत मुले दूर जाऊ लागतात. त्यांना आपले मोबाईलचे जग जास्त आवडू लागते. [Photo Credit: Pexel.com]
ही समस्या मोठ्यां माणसांना सुद्धा खूप सतावते आणि लहान मुलांना सुद्धा कारण सतत फोनवर असल्याने झोपेचे भान राहत नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री अपरात्री झोप येते आणि सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. मुलांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण झोप न आल्याने आणि ती पूर्ण न झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. [Photo Credit: Pexel.com]
मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोकाही निर्माण होऊ शकतो. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की मोबाईल फोन मधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतीकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उतिका विकसित होत असतात, त्या तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवतो. [Photo Credit: Pexel.com]
सोशल मीडियाचं जग जितकं मन रिफ्रेश करणारं आहे तितकंच ते चिंता वाढवणारं आहे. त्यामुळे त्यावर घडणाऱ्या अनेक गोष्टी मुलांच्या चिंता वाढवायला कारणीभूत ठरू शकतात आणि या चिंतेत अडकल्यावर डिप्रेशनमध्ये येऊन मुले काहीही करू शकतात. म्हणून त्यांच्या मोबाईलच्या अतिवापराला वेळीच आवर घाला आणि त्यांना सुरक्षित ठेवा. [Photo Credit: Pexel.com]