Avocado Disadvantage : एवोकॅडो जास्त खाल्ल्याने शरीराला फायदा तर होतोच, पण नुकसानही जाणून घ्या
एवोकॅडो आपल्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. यासोबतच मधुमेह, कॅन्सर, अपचन आणि जुलाब यांसारख्या समस्या आणि आजारांपासून मुक्त होण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण दिवसभरात जास्त प्रमाणात एवोकॅडो खाल्ल्यानेही नुकसान होऊ शकते.
आहार तज्ञ दिवसातून अर्धा एवोकॅडो खाण्याचा सल्ला देतात. आरोग्याच्या विविध समस्या, जीवनशैली आणि वयाच्या आधारे आहारातील एवोकॅडोच्या प्रमाणात बदलही करता येतात.
एवोकॅडोमध्ये कॅलरीज आणि आरोग्यदायी फॅट्सचे प्रमाण चांगले असते. जर तुम्ही एवोकॅडो जास्त खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते. आरोग्यासाठी योग्य प्रमाणात एवोकॅडो खाण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील, जसे की गॅस, ओटीपोटात दुखणे किंवा बद्धकोष्ठता. तर, जास्त प्रमाणात एवोकॅडो खाल्ल्याने हा त्रास आणखी वाढू शकतो. एवोकॅडोमध्ये आहारातील फायबर असते, जे जास्त प्रमाणात घेतल्यास पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
काही लोकांना एवोकॅडोवर ऍलर्जी होऊ शकते. एवोकॅडो ऍलर्जीमुळे तोंडात जळजळ, खाज सुटणे, सूज येणे, चिडचिड होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
एवोकॅडोचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात घेतले तर ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकते. यासोबतच एवोकॅडोचे सेवन गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.