Health News : फक्त 15 दिवस भात खाणं टाळा आणि पाहा कमाल, अनेक आजारांपासून होईल सुटका
जेव्हा तुम्ही भात खाता तेव्हा शरीरात कर्बोदकांचे प्रमाण वाढते. यामुळे झोप येते आणि शरीर सुस्त होते. याशिवाय जास्त भात खाल्ल्याने वजन असंतुलित होऊन लठ्ठपणा वाढतो. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही आहारात फक्त 15 दिवस भात खाणं बंद करा आणि पाहा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो. (Image Source : istock)
असे केल्याने तुम्हाला शरीरात अनेक बदल जाणवतील. तुम्ही व्यायाम किंवा इतर कोणत्याही शारीरिक हालचाली चांगल्या आणि सहज प्रकारे करू शकाल. (Image Source : istock)
भात खाणं कमी केल्याने शरीर अधिक सक्रिय होण्यास मदत होईल. तुम्हाला इतर दिवसांच्या तुलनेत अधिक उत्साही वाटेल. (Image Source : istock)
भात खाणं टाळल्यास तुम्हाला जास्त झोप येणार नाही आणि आळसही कमी येईल. तुमचा मेंदू जास्त सतर्क होईल आणि तुम्ही कोणतेही काम अधिक एकाग्रतेने करण्यास मदत होईल.(Image Source : istock)
मधुमेह आणि इतर अनेक आजारांमध्ये भात खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. (Image Source : istock)
शरीरात जितके जास्त कर्बोदके असतील तितकी साखर पचनाच्या वेळी तयार होईल. यामुळे तुम्हाला साखर नियंत्रणात अडचण येऊ शकते. (Image Source : istock)
मधुमेहींसाठी तसेच थायरॉईड आणि पीसीओडीच्या रुग्णांसाठीही शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. भात खाणं कमी केल्याने शरीरातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होईल. (Image Source : istock)
भात पचनासाठी जड असल्याने यामुळे पचनक्रिया मंदावते. भात खाणं कमी केल्याने वेगाने वजन कमी करण्यात मदत होते. (Image Source : istock)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image Source : istock)