International Olympic Day 2022 : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त बॉलिवूडच्या टॉप 5 सिनेमांची झलक

Continues below advertisement

International Olympic Day 2022

Continues below advertisement
1/7
International Olympic Day 2022 :23 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रामुख्याने आधुनिक ऑलिम्पिक खेळांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या पायाभरणीचे प्रतीक आहे.
2/7
भारतामध्येही स्पोर्ट्सवर, ऑलिम्पिक्सवर आधारित असे बरेच सिनेमे आहेत जे बॉलिवूड कलाकारांनी गाजवले आहेत. अशाच काही खेळाडूंचे गाजलेले सिनेमे आपण जाार आहोत. ज्या खेळाडूंच्या व्यक्तींना कलाकारांनी योग्य न्याय दिला आहे. असेच काही सिनेमे.
3/7
1. Gold : 1948 समर ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या तपन दासची न ऐकलेली आणि अज्ञात कथा या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार भारताच्या पहिल्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या सहाय्यक व्यवस्थापक दासची भूमिका साकारली आहे. तर कुणाल कपूरने कर्णधार सम्राटची भूमिका केली आहे.
4/7
2. Mery kom :अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमची मुख्य भूमिका साकारली आहे, जी मणिपूरमधील एका छोट्या शहरातील आहे. 2012 च्या समर ऑलिंपिकमध्ये सर्व अडचणींविरुद्ध मात करून, सामाजिक बंधनं मोडून जी विजेतेपद मिळवते. अशी ही भूमिका आहे. तसेच, आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग ऍथलीट अॅम्बेसेडर गटासाठी महिला प्रतिनिधी म्हणून मेरी कोमचे नावही निश्चित करण्यात आले आहे.
5/7
3. Bhaag Milkha Bhaag : या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तरने मिल्खा यांची भूमिका साकारली आहे. आर्थिक आणि सामाजिक अडथळे असतानाही मिल्खा सिंगच्या जगप्रसिद्ध धावपटू आणि ऑलिम्पियन बनण्याच्या प्रवासाभोवती कथानक फिरते.
Continues below advertisement
6/7
4. Sultan : या यादीतील एकमेव काल्पनिक चित्रपट म्हणजे सलमान खानचा सुलतान. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या वास्तविक जीवनातील कुस्तीपटूंवर एकही चित्रपट बनला नाही हे खेदजनक असले तरी, सुलतानची कथा उत्तर भारतातील लाडक्या खेळात देसी पेहेलवान कशाप्रकारे स्पर्धा करतात हे चित्रित करते.
7/7
5. Saina : ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू बनलेल्या हरियाणातील एका लहान शहरातील मुलीचे आयुष्य बायोपिकमध्ये सांगितले आहे. परिणिती चोप्रा हिने सायना नेहवालची भूमिका साकारली आहे. जिने लंडन येथे 2012 ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
Sponsored Links by Taboola